Breaking News LIVE : Maharashtra Corona Update : आज 21,081 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात 10,219 नवीन रुग्णांचे निदान
Breaking News LIVE Updates, 7 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

Background
राज्यात आजपासून अनलॉकची सुरुवात
जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेला महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होत आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, सरकारने 5 टप्प्यात राज्य अनलॉक करण्याबाबत नियमावली आखली आहे. जिल्ह्यांचा पॉझिटीव्हीटी रेट लक्षात घेत अनलॉकचा निर्णय घेण्यात येणार असून, कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या धर्तीवर निर्बंध काय आणि किती प्रमाणात शिथिल केले जातील याबाबत प्रशासनाकडून आदेश देण्यात येत आहेत.
मुख्यमंत्र्यांचा कोर्लई येथील घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी; किरीट सोमय्या यांचा आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथे खरेदी केलेल्या जमीन व्यवहार प्रकरणी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी यासंदर्भात रेवदंडा पोलिसांना पुरावे सादर केले होते. परंतु , यानंतरही या संदर्भात कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता. तर , या घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची मागणी देखील सोमय्या यांनी केली होती.
राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथील केलेले नाहीत, काटेकोर काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिष्टमंडळ सकाळी 11 वाजता पंतप्रधानांची भेट घेणार
सकाळी 7 वाजता मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार, सकाळी 9 वाजता दिल्ली विमानतळावर दाखल होणार,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे असं शिष्टमंडळ असणार, सकाळी 11 वाजता पंतप्रधानांची भेट घेणार
आज 21,081 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात 10,219 नवीन रुग्णांचे निदान
Maharashtra Corona Update : आज 21,081 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात 10,219 नवीन रुग्णांचे निदान तर 154 कोरोनाबाधितांचा मृत्यू #maharashtra #corona























