(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus India: तब्बल 61 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद; जाणून घ्या नेमका आकडा
विकसीत देशांपासून ते अगदी विकसनशील देशांपर्यंत सर्वत्रच कोरोनाचा कहर पाहायला मिळाला
Coronavirus India: जीवघेण्या कोरोना विषाणूनं बराच काळ संपूर्ण जगाची पाठ सोडलेली नाही. विकसीत देशांपासून ते अगदी विकसनशील देशांपर्यंत सर्वत्रच कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. भारतातही चित्र वेगळं नाही. मागील बऱ्याच दिवसांपासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातल्याचं पाहायला मिळत होतं. पण, आता मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट ही धीम्या गतीनं का असेना पण ओसरत असल्याचं दिसत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांमध्ये देशात 1 लाख 636 नवे कोरोनाबाधित आढळले. तर, 2427 नागरिकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. इतकंच नव्हे तर, 1 लाख 74 हजार 399 कोरोनाबाधितांनी या विषाणूच्या संसर्गावर मात केली.
61 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मागील 24 तासांत निदान झालेल्या कोरोनाबाधितांचा आकडा मागील 61 दिवसांमधील सर्वात कमी असल्याचं कळत आहे. यापूर्वी 7 एप्रिलला इतक्या कमी रुग्णांची नोंद झाली होती. देशातील दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट आता 6.34 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर
एकूण आकडेवारी किती?
एकूण कोरोनाबाधित - 2 कोटी 89 लाख 9 हजार 975
एकूण कोरोनामुक्त - 2 कोची 71 लाख 59 हजार 180
एकूण मृत्यू - 3 लाख 49 हजार 186
एकूण सक्रिय रुग्ण - 14 लाख 01 हजार 609
India reports 1,00,636 new #COVID19 cases, 1,74,399 discharges, and 2427 deaths in the last 24 hours, as per Health Ministry
— ANI (@ANI) June 7, 2021
Total cases: 2,89,09,975
Total discharges: 2,71,59,180
Death toll: 3,49,186
Active cases: 14,01,609
Total vaccination: 23,27,86,482 pic.twitter.com/3DNEhXAN4E
देशातील लसीकरणालाही काहीसा वेग
देशात लसींच्या तुटवड्यामुळं काहीसं थंडावलेलं लसीकरण पुन्हा एकदा अंशत: वेगानं सुरु झालं आहे. मागील 24 तासांत 13 लाख 90 हजार 916 लसी देण्यात आल्या. ज्यामुळं एकूण लसीकरणाचा आकडा 23 कोटी 27 लाख 86 हजार 482 वर पोहोचला आहे. आयसीएमआरच्या माहितीनुसार रविवारच्या दिवसभरात देशात 15 लाख 87 हजार 589 नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले.