![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PM Modi : रेल्वेत सीट मिळवण्यासाठी मोदींची यु्क्ती भारी, ज्योतिषी बनून साधली संधी! पंतप्रधानांनी सांगितला भन्नाट किस्सा
PM Modi : ज्योतिष अरिदमन क्रिएटरला पुरस्कार देताना पंतप्रधानांनी रेल्वे आणि ज्योतिषबाबत एक मजेशीर प्रसंग सांगितला. तो ऐकून सभागृहातील उपस्थितांचा एकच हशा पिकला.
![PM Modi : रेल्वेत सीट मिळवण्यासाठी मोदींची यु्क्ती भारी, ज्योतिषी बनून साधली संधी! पंतप्रधानांनी सांगितला भन्नाट किस्सा Prime Minister Narendra Modi strategy to get seat in railway opportunity to become an astrologer marathi news PM Modi : रेल्वेत सीट मिळवण्यासाठी मोदींची यु्क्ती भारी, ज्योतिषी बनून साधली संधी! पंतप्रधानांनी सांगितला भन्नाट किस्सा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/08/c7aaad92bbd8a4a687236a42c4f7fde81709872527480865_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Modi : "जेव्हा मी लहान होतो आणि ट्रेनमध्ये प्रवास करायचो तेव्हा त्यांना जागा मिळत नव्हती. अशात योग्य संधी दिसली की लगेच लोकांच्या हाताकडे पाहून भविष्य सांगायचे" पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शुक्रवारी 23 सोशल मीडिया इन्फ्लुअर्सना नॅशनल क्रिएटर्स पुरस्काराने (National Creators Awards) सन्मानित केले. यादरम्यान ज्योतिष अरिदमन नावाच्या क्रिएटरला पुरस्कार देताना त्यांनी रेल्वे आणि ज्योतिषबाबत एक मजेशीर प्रसंग सांगितला.
पंतप्रधान मोदी ज्योतिष्यासारखे हात पाहू लागले की...
पंतप्रधान मोदींनी ज्योतिष आणि रेल्वेबाबत भन्नाट किस्सा सांगत आपल्या आठवणींना उजाळा दिला, कार्यक्रम दरम्यान त्यांचा हा किस्सा ऐकणाऱ्या उपस्थितांचा देखील एकच हशा पिकला. पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा मी लहान होतो आणि ट्रेनमध्ये प्रवास करायचो तेव्हा त्यांना जागा मिळत नव्हती. ट्रेनमध्येही खूप गर्दी होती. अशा वेळी योग्य संधी दिसली की ते लगेच लोकांच्या हाताकडे पाहून भविष्य सांगायला सुरूवात करायचे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, ज्योतिष ही अशी गोष्ट आहे की, ज्यामुळे प्रत्येकजण आपला हात दाखवायला तयार असतो. पंतप्रधान मोदी ज्योतिष्यासारखे हात पाहू लागले की लगेच लोक त्याला अगदी उत्साहाने त्यांच्यासमोर बसायचे. आणि मग आपोआपच बसायला सीट मिळायची'
#WATCH | Delhi: At the first ever National Creators Award, Prime Minister Narendra Modi presents the Disruptor of the Year award to Ranveer Allahbadia (BeerBiceps) at Bharat Mandapam. pic.twitter.com/YCXrqLM70E
— ANI (@ANI) March 8, 2024
सोशल मीडिया इन्फ्लुअर्सचा सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममधील सोशल मीडिया इन्फ्लुअर्सचा सन्मान केला आहे. हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कारासह 20 श्रेणींमध्ये दिला जातो. यामध्ये द डिसप्टर ऑफ द इयर, सेलिब्रिटी क्रिएटर ऑफ द इयर, ग्रीन चॅम्पियन अवॉर्ड, बेस्ट क्रिएटर फॉर सोशल चेंज, मोस्ट इम्पॅक्टफुल ॲग्री क्रिएटर, कल्चरल ॲम्बेसेडर ऑफ द इयर, इंटरनॅशनल क्रिएटर अवॉर्ड, बेस्ट ट्रॅव्हल क्रिएटर अवॉर्ड, क्लीनली ॲम्बेसेडर ॲवॉर्ड यांचा समावेश आहे.
कोणत्या श्रेणींमध्ये देण्यात आला पुरस्कार
याशिवाय प्रभावकारांना द न्यू इंडिया चॅम्पियन अवॉर्ड, टेक क्रिएटर अवॉर्ड, हेरिटेज फॅशन आयकॉन अवॉर्ड, मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर (पुरुष आणि महिला), फूड कॅटेगरीतील बेस्ट क्रिएटर, एज्युकेशन कॅटेगरीतील बेस्ट क्रिएटर, गेमिंग कॅटेगरीमध्ये बेस्ट क्रिएटर अवॉर्ड देण्यात येणार आहेत. , सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटर. , सर्वोत्कृष्ट नॅनो क्रिएटर, बेस्ट हेल्थ आणि फिटनेस क्रिएटर या श्रेणींमध्ये देखील सन्मानित करण्यात आले आहे.
मैथिली ठाकूर ठरली 'बेस्ट'!
सोशल मीडियावर क्षणात प्रसिद्ध आलेली मैथिली ठाकूर यांच्या नावाला परिचयाची गरज नाही. बिहारमधील मैथिली तिच्या दोन लहान भावांसोबत सोशल मीडियावर भजन आणि लोकगीते गाताना दिसली आहे. लहान वयातच संगीत आणि लोककलेबद्दलचे त्यांचे समर्पण पाहून सोशल मीडिया यूजर्स प्रभावित झाले आहेत, त्यांच्या गायनाने अनेक लोक पाश्चात्य संगीताकडून आपल्या भारतीय पारंपरिक मुळांकडे परत येऊ लागले. रॉक आणि पॉप संगीताच्या या युगात मैथिलीची गाणी एक वेगळाच दिलासा देतात.
हेही वाचा>>>
Maharashtra : मोदींनी खासदारांचा 8000 कोटींचा फंड थांबवला आणि स्वतःसाठी 7500 कोटींचं आलिशान विमान घेतलं; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)