Maharashtra : मोदींनी खासदारांचा 8000 कोटींचा फंड थांबवला आणि स्वतःसाठी 7500 कोटींचं आलिशान विमान घेतलं; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
Lok Sabha Election 2024 : मोदींनी खासदारांचा आठ हजार कोटींचा फंड थांबवला आणि स्वतःसाठी साडेसात हजार कोटींचे आलिशान विमान घेतलं, असा आरोप विनायक राऊतांनी केला आहे.
Sindhrdurg News : सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना काळात खासदारांचा आठ हजार कोटी निधी थांबवला आणि स्वतःसाठी साडेसात हजार कोटींचे आलिशान विमान घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला. सिंधुदुर्गमध्ये (Sindhrdurg) प्रचारप्रमुख म्हणून आलेल्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या लोकांच्या पोटावर पाय आणल्याची टीकाही त्यांनी केली.
विनायक राऊतांना पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात खासदारांचा 8000 कोटी निधी थांबवून स्वतःसाठी 7500 कोटींचे आलिशान विमान घेतलं असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. प्रचारप्रमुख गोव्यातून आणावे लागतात, अशी वेळ भाजपवर आली असल्याची टीका करत प्रमोद सावंत यांनी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांवर अन्याय केला. सिंधुदुर्गातील लोकांच्या पोटावर पाय आणण्याचं काम गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केल्याची टीका देखील विनायक राऊत यांनी केली.
प्रमोद सावंतांना टोला
सिंधुदुर्गसाठी प्रचारप्रमुख गोव्यातून आणावे लागतात अशी वेळ भाजपवर आली असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली. प्रमोद सावंत यांनी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांवर अन्याय केला, लोकांच्या पोटावर पाय आणण्याचं कामं केल्याचा आरोपही त्यांनी केला.