PM Modi : 'काँग्रेसने ज्या गावांना शेवटचं म्हटलं, ते माझ्यासाठी पहिलं गाव...' सेला बोगद्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींचा निशाणा
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगातील सर्वात लांब बोगदा 'सेला टनेल' (Sela Tunnel) यासह अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.
PM Modi : काँग्रेसने (Congress) सीमावर्ती गावांकडेही दुर्लक्ष केले, त्यांना देशातील शेवटची गावे म्हणत त्यांना फाटा दिला, पण माझ्यासाठी हे पहिले गाव आहे. आम्ही त्यांना शेवटची गावे नाही, तर पहिले गाव मानले, त्या गावात व्हायब्रंट ग्राम कार्यक्रम सुरू केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचलला भेट दिली. यावेळी त्यांनी जगातील सर्वात लांब बोगदा 'सेला टनेल' (Sela Tunnel) यासह अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. 'विकसित भारत, विकसित नॉर्थईस्ट' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी या भागात सुरू असलेले विकास काम लोकांसमोर मांडले, यावेळी त्यांनी सांगितले की ईशान्येच्या विकासासाठी आमची दृष्टी सकारात्मक आहे.
'मोदींची गॅंरटी'चा अर्थ पंतप्रधानांनी सांगितला...
कार्यक्रमात संवाद साधताना पंतप्रधानांनी 'मोदींची गॅंरटी चा अर्थही सांगितला, ते म्हणाले की ''मोदींची गॅंरटी' म्हणजे काय, ते तुम्हाला अरुणाचलमध्ये दिसेल. 2019 मध्ये मी सेला बोगद्याच्या पायाभरणीचे काम सुरू केले. हे आज सुरू होत आहे, ही खात्रीशीर हमी म्हणजेच गॅंरटी नाही का?
ईशान्य भागाचा चौपट वेगाने विकास
आज येथे 55 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे. ते म्हणाले की, भारतातील ईशान्य भागात विकासाची कामे चौपट वेगाने सुरू आहेत. विकसित राज्यातून विकसित राज्यापर्यंतचा भारताचा राष्ट्रीय उत्सव देशभरात वेगाने सुरू आहे. आज मला विकसित ईशान्येच्या या उत्सवात ईशान्येतील सर्व राज्यांसह एकत्र सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
सेला बोगद्याचे वैशिष्ट्य काय आहे?
सेला बोगद्याचे वैशिष्ट्य सांगायचे तर, सेला बोगदा हा चीन सीमेच्या अगदी जवळ आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा बोगदा चीनच्या सीमेला लागून असलेल्या तवांगला सर्व हवामान कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. इतक्या उंचीवर बांधलेला हा जगातील सर्वात लांब दोन लेन बोगदा आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी ते राष्ट्राला समर्पित केले. याशिवाय 20 विकास प्रकल्पांचे भूमिपूजनही त्यांनी केले.
प्रत्येक हंगामातील कनेक्टिव्हिटी
13,000 फूट उंचीवर स्थित सेला बोगदा अरुणाचल प्रदेशातील तवांगला सर्व हवामान कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. LAC च्या जवळ असल्यामुळे हा बोगदा धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. बलिपारा-चरिद्वार-तवांग रस्ता बर्फवृष्टीमुळे आणि अतिवृष्टीमुळे भूस्खलनामुळे वर्षभर बराच काळ बंद राहिल्याने सेला खिंडीजवळ असलेल्या बोगद्याची खूप गरज होती.
हेही वाचा>>>
LAC वर भारतीय सैन्याची क्षमता वाढणार, चीन सीमेजवळ असणाऱ्या बोगद्याची खासियत काय?