एक्स्प्लोर
Advertisement
अमूल दूध प्रति लीटर दोन रुपयांनी महागले
मुंबई : अमूल दुधाच्या दरामध्ये आजपासून प्रति लीटर दोन रुपयांची वाढ होणार आहे. गुजरात कोऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशननं (GCMMF) हा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरातील अमूलची ही दुसऱ्यांदा दरवाढ असून, या वाढीमुळे प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रातील ग्राहकांवर याचा परिणाम होणार आहे.
अमूलने आपल्या सर्वच सहा ब्रँडमध्ये ही वाढ केली आहे. याबाबत गुजरात कोऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF) संचालक आरएस सोढी यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांकडून चढ्यादराने दूध खरेदी करावे लागत असल्याने, दुधाच्या दरात वाढ करावी लागली आहे.
सोढी पुढे म्हणाले की, GCMMF च्या वतीने 2014 नंतर दुधाव्यतिरिक्त इतर कोणत्याही दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढ करण्यात आली नव्हती. पण गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी लोणी, तूप, बटर मिल्क आणि आईस्क्रिमच्या किमतींमध्ये किरकोळ दरवाढ करावी लागली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement