Presidential Election : राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा आज करणार उमेदवारी अर्ज दाखल, 'हे' दिग्गज नेते राहणार उपस्थित
Presidential Election 2022 : यशवंत सिन्हा हे आज राष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी विरोधी पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
Presidential Election 2022 : सध्या देशात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लागली आहे. सत्ताधारी भाजपकडून राष्ट्रपती पदासाठी 24 जूनला द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा (yashwant sinha) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, आज यशवंत सिन्हा हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी विरोधी पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व विरोधक एकत्र येत आपली एकडूट दाखवणार आहेत.
दरम्यान, आज साडेअकरा वाजता संसद भवनाच्या अॅनेक्सीमध्ये विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव उपस्थित राहणार आहेत. हे सर्व नेते यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाख ल करताना देखील उपस्थित राहणार आहेत.
कसा असेल आजचा कार्यक्रम
सकाळी 11.30 वाजता
संसद भवन अॅनेक्सीमध्ये विरोधकांची बैठक होणार आहे
दुपारी 12 वाजता
राज्यसभेच्या सरचिटणीस कार्यालयाबाहेर विरोधी पक्षांचे नेते जमणार आहेत
दुपारी 12.15 वाजता
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा उमेदवारी दाखल करणार आहेत
दुपारी 1.10 वाजता
नामांकनानंतर यशवंत सिन्हा यांची पत्रकार परिषद
एनडीएचं पारडं जड
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीएकडे संख्याबळ खूपच कमी आहे. मात्र, आपल्या उमेदवाराला कमी लेखण्याची चूक होता कामा नये, असा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. सध्या एनडीएचं पारडं जड दिसत आहे. कारण, एनडीएकडे एकूण 5.26 लाख मते आहेत, जी एकूण मतांच्या सुमारे 49 टक्के आहेत. एनडीएला विजयासाठी एक टक्का मतांची गरज आहे. दुसऱ्या पक्षाच्या पाठिंब्यानं ते शक्य होऊ शकते.
यशवंत सिन्हा यांची कारकीर्द
यशवंत सिन्हा यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1937 रोजी बिहारमधील पाटणा येथील सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर 1960 पर्यंत पाटणा विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केले. पाटणा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांना प्रशासकीय सेवेत रुजू होण्याची इच्छा होती. त्यामुळे या काळात त्यांनी आयएएसची तयारी सुरू ठेवली. 1960 मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली. त्यांनी 24 वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. यादरम्यान त्यांनी बिहार सरकारच्या वित्त मंत्रालयात सचिव आणि उपसचिव म्हणून दोन वर्षे काम केले. यानंतर त्यांची भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात उपसचिव पदावर नियुक्ती झाली. यशवंत सिन्हा यांनी त्यांच्या कार्यकाळात भारतीय दूतावासातील महत्त्वाची जबाबदारीही सांभाळली. 1971 ते 1974 या काळात त्यांची जर्मनीतील भारतीय दूतावासाचे प्रथम सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
1986 मध्ये जनता पक्षात प्रवेश
तब्बल अडीच दशके भारतीय प्रशासकीय सेवेत राहिल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजकारणात प्रवेश पाऊल ठेवलं. 1986 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना पक्षाचे सरचिटणीसपद देण्यात आले. 1988 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले. पुढे 1989 मध्ये त्यांच्या पक्षाची जनता दलाशी युती झाल्यानंतर त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवण्यात आले. 1990-91 मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्रीपदही भूषवले होते. त्यानंतर 1998 ते 2002 पर्यंत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. 2002 मध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे पदही भूषवले होते. यशवंत सिन्हा यांनी 2009 मध्ये भाजपच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 2018 मध्ये भाजप सोडल्यानंतर ते 2021 मध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील TMC मध्ये सामील झाले.
महत्वाच्या बातम्या:
- Yashwant Sinha Profile: विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिलेले 'यशवंत सिन्हा' कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Presidential Elections 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा असणार विरोधी पक्षांचे उमेदवार, शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत झाला निर्णय