एक्स्प्लोर

Yashwant Sinha Profile: विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिलेले 'यशवंत सिन्हा' कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

President Election 2022: देशाचा पुढील राष्ट्रपती कोण होणार यावरून राजकारण तापले आहे. यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील.

President Election 2022: देशाचा पुढील राष्ट्रपती कोण होणार यावरून राजकारण तापले आहे. सध्या सर्वांच्या नजरा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांकडे लागल्या आहेत. यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. आज दिल्लीत झालेल्या विरोधकांच्या बैठकीत यशवंत सिन्हा यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. तत्पूर्वी यशवंत सिन्हा यांनी एक ट्वीट करत लिहिले होते की, एका मोठ्या राष्ट्रीय कारणासाठी आता मी पक्ष सोडून विरोधी ऐक्यासाठी काम केले पाहिजे. त्यांच्या ट्विटचा अर्थ समजून घेण्याचा सर्व प्रयत्न करत असतानाच विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. जाणून घ्या कोण आहेत राष्ट्रपती निवडणुकीचे विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा.

पाटणा विद्यापीठात होते शिक्षक

यशवंत सिन्हा यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1937 रोजी बिहारमधील पाटणा येथील सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर 1960 पर्यंत पाटणा विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केले. पाटणा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांना प्रशासकीय सेवेत रुजू होण्याची इच्छा होती. त्यामुळे या काळात त्यांनी आयएएसची तयारी सुरू ठेवली. 1960 मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली. त्यांनी 24 वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. यादरम्यान त्यांनी बिहार सरकारच्या वित्त मंत्रालयात सचिव आणि उपसचिव म्हणून दोन वर्षे काम केले. यानंतर त्यांची भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात उपसचिव पदावर नियुक्ती झाली. यशवंत सिन्हा यांनी त्यांच्या कार्यकाळात भारतीय दूतावासातील महत्त्वाची जबाबदारीही सांभाळली. 1971 ते 1974 या काळात त्यांची जर्मनीतील भारतीय दूतावासाचे प्रथम सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

राजकारणात प्रवेश

तब्बल अडीच दशके भारतीय प्रशासकीय सेवेत राहिल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजकारणात प्रवेश पाऊल ठेवलं. 1986 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना पक्षाचे सरचिटणीसपद देण्यात आले. 1988 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले.

पुढे 1989 मध्ये त्यांच्या पक्षाची जनता दलाशी युती झाल्यानंतर त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवण्यात आले. 1990-91 मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्रीपदही भूषवले होते. त्यानंतर 1998 ते 2002 पर्यंत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. 2002 मध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे पदही भूषवले होते. यशवंत सिन्हा यांनी 2009 मध्ये भाजपच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 2018 मध्ये भाजप सोडल्यानंतर ते 2021 मध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील TMC मध्ये सामील झाले.

संबंधित बातमी: 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा असणार विरोधी पक्षांचे उमेदवार, शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत झाला निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
D Mart sale: आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
Amabadas Danve: भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
D Mart sale: आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
Amabadas Danve: भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Mhada home Lottery: सामान्य मुंबईकरांना वरळीत अलिशान घरं मिळणार, म्हाडा बांधणार 85 मजली टॉवर, आणखी कोणत्या पंचतारांकित सुविधा असणार?
सामान्य मुंबईकरांना वरळीत अलिशान घरं मिळणार, म्हाडा बांधणार 85 मजली टॉवर, आणखी कोणत्या पंचतारांकित सुविधा असणार?
Temperature Today: राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!
Wing Commander Namansh Syal: वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
Embed widget