एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरु, 17 जुलैला मतदान
नवी दिल्ली : आजपासून देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज अधिसुचना जारी कऱण्यात येईल. 28 जून ही राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. आज यूपीएच्या अनेक घटकपक्षांशी राष्ट्रपती निवडणुकीबाबत बैठक होणार आहे.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदावार देण्यासंदर्भात विरोधी पक्षांनी तयार केलेल्या 10 सदस्यीस समितीची देखील पहिली बैठक आज दिल्लीत होणार आहे.
राष्ट्रपतीपदासाठी एकमत होऊ शकलं नाही तर 17 जुलैला मतदान आणि 20 जुलैला निकाल जाहीर होणार आहे. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपतो आहे. एनडीए आणि यूपीए या दोन्ही बाजूंनी या निवडणुकीवरुन जोरदार खलबतं सुरु आहेत. नुकतीच दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी या निवडणुकीच्या रणनीतीसाठी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्याला 17 पक्षांनी हजेरी लावलेली होती.
यूपीच्या महाविजयानंतर एनडीएचं संख्याबळ वाढलेलं आहे. शिवाय जगमोहन रेडड्डी यांचा वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रसमितीचे के सी आर राव यांच्या पक्षानं एनडीएला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे. पण तरीही यूपीएकडून तुल्यबळ लढत देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यूपीएनं उमेदवारांच्या शोधसमितीसाठी शरद पवार यांना समन्वयक म्हणून नेमलेलं आहे. त्यामुळे एखादा सर्वसहमतीचा उमेदवार पुढे येतो का हे ही पाहणं महत्वाचं आहे.
राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया :
– उमेदवाराच्या अर्जावर 50 प्रस्तावक, 50 अनुमोदक असणं गरजेचं.
– उमेदवाराला निवडणुकीसाठी 15 हजार रूपये अनामत रक्कम जमा करावी लागणार.
– संसद, राज्यांच्या विधानसभा, दिल्ली व पुडुच्चेरी या केंद्रशासित राज्यांच्या विधानसभा या ठिकाणी मतदान होणार
– गुप्त मतदान पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल.
– निवडणूक आयोगानं दिलेल्या विशेष पेनानंच मतदान केलं जाईल.
– यात मतदारांना पसंती क्रम द्यायचे असतात ( 1 ते… जितके उमेदवार)
– राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी कुठलाही व्हिप जारी करू शकत नाही.
– लोकसभेचे सेक्रेटरी जनरल, राज्यसभेचे सेक्रेटरी जनरल हे संसदेच्या मतदानासाठी निवडणूक अधिकारी
राष्ट्रपती निवडणुकीची वैशिष्ट्ये-
– निवडणुकीची अधिसूचना 14 जून रोजी काढण्यात येईल.
– अर्ज करण्यासाठी शेवटी तारीख 28 जून असणार आहे.
– उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी 29 जूनला होईल.
– १ जुलै अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम तारीख असेल.
– मतदानाची गरज पडली तर 17 जुलैला मतदान होईल.
– मतमोजणी 20 जुलैला होईल.
संबंधित बातम्या:
राष्ट्रपती निवडणुकीचं बिगुल वाजलं
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?
राष्ट्रपती व्हायचं असेल, तर पवारांनी एनडीएत यावं: आठवले
राष्ट्रपती निवडणुकीची खलबतं, सोनिया गांधींनी बोलावली देशभरातील 17 विरोधी पक्षांची बैठक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement