Delhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू की पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाची कार सर्वात पॉवरफुल? वैशिष्ट्ये आणि किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
President & PM Special Car : पीएम मोदी आणि राष्ट्रपतींच्या गाडीमागे कारचा मोठा ताफा येतो. एसपीजी कमांडो पंतप्रधानांच्या गाडीभोवती तैनात आहेत.
President & PM Special Car : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ज्या कारने प्रवास करतात त्या कार सर्वांना फार आकर्षित करतात. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांसारख्या मोठ्या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींची सुरक्षाव्यवस्था किती तगडी असेल हा सामान्य लोकांचा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमक्या कोणत्या गाडीने प्रवास करतात आणि त्या कारचं वैशिष्ट्य नेमकं काय या संदर्भात माहिती सांगणार आहोत. तर, देशाच्या राष्ट्रपती मुर्मू मर्सिडीज-बेंझ S600 पुलमन गार्ड लिमोझिन कारमधून प्रवास करतात. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी रेंज रोव्हर सेंटिनेल कारला प्राधान्य देतात. यासाठीच पंतप्रधान अनेकदा रेंज रोव्हर सेंटिनेलमध्ये फिरताना दिसतात. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी अधूनमधून टोयोटा आणि मर्सिडीजमधून देखील प्रवास करतात. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या कारमध्ये अॅडव्हान्स सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत आणि त्या जगातील सर्वात सुरक्षित कार असल्याचं मानलं जातं. दोन्ही आलिशान कार आहेत आणि त्यांची किंमत सुमारे 10 कोटींच्या आसपास आहे.
सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था
देशातील या दोन मोठ्या पदांचा पदभार स्वीकारणाऱ्या लोकांसाठी सर्वात महत्त्वाची सुरक्षा असते. यासाठी यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात येते. या कार हँडगन शॉट्स घेऊ शकतात आणि स्फोटकांचा देखील त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. पीएम मोदी आणि राष्ट्रपतींच्या गाडीमागे कारचा मोठा ताफा येतो. एसपीजी कमांडो पंतप्रधानांच्या गाडीभोवती तैनात आहेत. या गाड्यांना बॅलिस्टिक संरक्षण देखील आहे. गोळ्या आणि स्फोटकांचाही त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे AK-47 चाही त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाड्यांचे टायर कधीच पंक्चर होत नाहीत आणि पंक्चर झाले तरी तासनतास चालवता येतात. अशा प्रकारे कडक सुरक्षेसाठी कडक व्यवस्था असते.
वाहनांचा वेग किती असतो?
या गाड्यांचा वेग पाहता सर्वसामान्यांनाही आश्चर्य वाटेल इतका वेग असतो. या गाड्यांना ऑटोमॅटिक लॉक आहे आणि बदलत्या हवामानाचा या वाहनांवर काहीही परिणाम होत नाही. तसेच, कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यादरम्यान या गाड्यांचे इंधन लीक होत नाही. या गाड्या फार मजबूत असतात. जगातील अनेक मोठे उद्योगपती या गाड्या वापरतात. राष्ट्रपतींची गाडी ताशी 100 किमीचा वेग 8 सेकंदात गाठू शकते, तर पंतप्रधान मोदींची कार 10 सेकंदात 100 किमीचा वेग गाठू शकते. पीएम मोदींच्या कारचा सर्वाधिक वेग ताशी 193 किलोमीटर आहे. या गाड्यांमध्ये आतील बाजूस बरीच जागा असून यांच्या सीट आरामदायी बनवण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :