एक्स्प्लोर

Prashant Kishor : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नाकारली काँग्रेसची ऑफर, रणदीप सुरजेवाला यांची माहिती 

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस कमिटीत येण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

Prashant Kishor : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने आता 2024 ची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पक्षात अनेक बदल सुचवण्यात आले असून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जात होती. मात्र, आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेस कमिटीत येण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 2024 साठी एक कृती गट तयार केला होता. प्रशांत किशोर यांनाही या गटाचा भाग बनून सर्व जबाबदाऱ्या स्वीकारण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आणि पक्षाला दिलेल्या सूचनांचा आम्ही आदर करतो, असे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी म्हटले आहे.  

प्रशांत किशोर यांनीही ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीची जबाबदारी स्वीकारण्याची काँग्रेसची मोठी ऑफर मी नाकारली आहे. खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्या सोडवण्यासाठी पक्षाला सक्षम नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची जास्त गरज आहे. " 

प्रशांत किशोर यांनी या पूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यातून सोनिया गांधी यांना आगामी निवडणुकांबाबत काही सूचना देण्यात आल्या होत्या. सोनिया गांधी यांनी स्वतः प्रशांत किशोर यांची अनेक वेळा भेट घेतली होती. यानंतर काँग्रेस लवकरच प्रशांत किशोर यांच्याकडे पक्षातील महत्त्वाचे पद सोपवू शकते, असे बोलले जात होते. मात्र, आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ही ऑफर नाकारली आहे.   

दरम्यान, 13 ते 15 मे या कालावधीत राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसचे चिंतन शिबिर आयोजित केले जाणार आहे. तब्बल 9 वर्षांनंतर पक्षातर्फे अशा प्रकारचे चिंतन शिबिर आयोजित केले जात आहे. विशेष म्हणजे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 6 समित्यांमध्ये काँग्रेसच्या नाराज जी-23 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रशांत किशोर यांच्या सांगण्यावरूनच हे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कारण त्यांनी स्वतः G-23 च्या काही नेत्यांची भेट घेतली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अबु अझमींना जेलमध्ये टाकतो..छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात हल्लाबोल
अबु अझमींना जेलमध्ये टाकतो..छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात हल्लाबोल
Serbia Parliament : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिबा अन् सरकारी धोरणांचा विरोध करत विरोधी खासदारांनी थेट देशाच्या संसदेत स्मोक ग्रेनेड फेकले; अवघा युरोप हादरला!
Video : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिबा अन् सरकारी धोरणांचा विरोध करत विरोधी खासदारांनी थेट देशाच्या संसदेत स्मोक ग्रेनेड फेकले; अवघा युरोप हादरला!
Jaykumar Gore: तुम्ही महिलेला नाXX फोटो पाठवले की नाही सांगा, पत्रकाराच्या प्रश्नावर जयकुमार गोरे कोर्टाचा आदेश फलकवत म्हणाले...
तुम्ही महिलेला नाXX फोटो पाठवले की नाही सांगा, पत्रकाराच्या प्रश्नावर जयकुमार गोरे कोर्टाचा आदेश फलकवत म्हणाले...
Ajit Pawar on Rohit Pawar : तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या! दोन दिवसांपासून पुतण्याने काकांना घेरले, आज काकांनी पुतण्याला टप्प्यात येताच घेरले, दोघांमध्ये नेमकं घडलं तरी काय?
तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या! दोन दिवसांपासून पुतण्याने काकांना घेरले, आज काकांनी पुतण्याला टप्प्यात येताच घेरले, दोघांमध्ये नेमकं घडलं तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar|अमृत योजना घोटाळा प्रकरण; सचिव सुजाता सौनिक यांचं एकनाथ शिंदेंबाबत कोर्टात एफिडेविटRohit Pawar Mumbai | राजीनामा देऊन विषय संपत नाही-धनंजय मुंडेंना सहआरोपी करा..- पवारVijay Wadettiwar On Congress | काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले..Vijay Wadettiwar : भाजपचा मंत्री महिलेच्या मागे लागलाय, विजय वडेट्टीवारांचा रोख कुणावर? ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अबु अझमींना जेलमध्ये टाकतो..छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात हल्लाबोल
अबु अझमींना जेलमध्ये टाकतो..छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात हल्लाबोल
Serbia Parliament : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिबा अन् सरकारी धोरणांचा विरोध करत विरोधी खासदारांनी थेट देशाच्या संसदेत स्मोक ग्रेनेड फेकले; अवघा युरोप हादरला!
Video : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिबा अन् सरकारी धोरणांचा विरोध करत विरोधी खासदारांनी थेट देशाच्या संसदेत स्मोक ग्रेनेड फेकले; अवघा युरोप हादरला!
Jaykumar Gore: तुम्ही महिलेला नाXX फोटो पाठवले की नाही सांगा, पत्रकाराच्या प्रश्नावर जयकुमार गोरे कोर्टाचा आदेश फलकवत म्हणाले...
तुम्ही महिलेला नाXX फोटो पाठवले की नाही सांगा, पत्रकाराच्या प्रश्नावर जयकुमार गोरे कोर्टाचा आदेश फलकवत म्हणाले...
Ajit Pawar on Rohit Pawar : तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या! दोन दिवसांपासून पुतण्याने काकांना घेरले, आज काकांनी पुतण्याला टप्प्यात येताच घेरले, दोघांमध्ये नेमकं घडलं तरी काय?
तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या! दोन दिवसांपासून पुतण्याने काकांना घेरले, आज काकांनी पुतण्याला टप्प्यात येताच घेरले, दोघांमध्ये नेमकं घडलं तरी काय?
Jaykumar Gore : भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
Jaykumar Gore nude photo: मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानची पहिली कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला!
चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानची पहिली कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला!
Embed widget