एक्स्प्लोर
Advertisement
राहुल गांधींना 'लायर ऑफ इ द ईयर' पुरस्काराने गौरवण्यात यावं; प्रकाश जावडेकरांची राहुल गांधींवर टीका
राहुल गांधीं 'लायर ऑफ इ द ईयर' पुरस्कारासाठी पात्र आहेत, असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टिका केली आहे.
नवी दिल्ली : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सडकून टिका करत त्यांना खोटारडा संबोधलं आहे. प्रकाश जावडेकर बोलताना म्हणाले की, राहुल गांधी एवढं खोटं बोलतात की, ते 'लायर ऑफ इ द ईयर' पुरस्कारासाठी पात्र आहेत. दरम्यान, राहुल गांधी एका सभेत बोलताना म्हणाले होते की, एनपीआर गरिबांवर लावण्यात आलेला टॅक्स आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना जावडेकरांनी राहुल गांधींवर तोफ डागली आहे. एवढचं नाहीतर जावडेकरांनी बोलताना काँग्रेसच्या काळात झालेल्या सर्व घोटाळ्यांचा उल्लेख करत राहुल गांधींवर थेट निशाणाही साधला आहे.
राहुल गांधींच्या टिकेला प्रत्युत्तर देताना प्रकाश जावडेकर म्हणाले की, राहुल गांधी सभेत बोलताना म्हणाले की, NPR गरिबांवर लावण्यात आलेला टॅक्स आहे. NPR तो लोकसंख्या नोंदणी आहे, यामध्ये लोकांच्या माहितीची नोंदणी करून ठेवली जाते. यात टॅक्सची गोष्ट कुठून आली. टॅक्स काँग्रेसने भारतात रूजवलेली संस्कृती आहे. त्यामध्ये जयंती टॅक्स, कोळसा टॅक्स, 2G टॅक्स, जीजाजी टॅक्स यांसारख्या गोष्टिंचा समावेश आहे.
पाहा व्हिडीओ : काँग्रेसच्या नेतृत्वात तुकडे-तुकडे गँगने दिल्लीत अशांतता पसरवली : अमित शाह
प्रकाश जावडेकर म्हणाले की, राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हाही आणि आताही काहीही बोलतात. एवढंच नाहीतर सतत खोटंही बोलतात. 2019मधील 'लायर ऑफ इ द ईयर' या पुरस्कारासाठी ते पात्र आहेत. आधी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचं कुटुंब वैतागलेलं होतंच, पण आता जनता आणि संपूर्ण काँग्रेस पक्षही वैतागलं आहे.
प्रकाश जावडेकर म्हणाले की, आज आम्ही काँग्रेसकडे दोन मागण्यात करतोय, पहिली खोटं बोलणं बंद करा कारण यामुळे जनता अजिबात फसणार नाही. तसेच ते बोलताना म्हणाले की, देशातील जनतेने काँग्रेसला रिजेक्ट केलं आहे. त्यामुळे कर्जमाफीसारखी खोटी वचनं देणं बंद करा. देशातील सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे की, आधी स्वतः नारगिकत्व दुरूस्ती कायदा समजून घ्या. अन्यथा खोट्या गोष्टी पसरवणारे राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी आपल्यात भांडणं लावतील.' पुढे बोलताना राहुल गांधींवर निशाणा साधत ते म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार आहे, 'जिथे एका महिन्यात 77 मुलांचा मृत्यू झाला आहे. राहुल गांधींना जर जायचं असेल तर तिथे त्यांनी जावं आणि आपलं सरकार असलेल्या राज्यात सुधारणा द्याव्यात.'
संबंधित बातम्या :
भावा-भावांमध्ये भांडणं लावून विकास होणार नाही; राहुल गांधींचा मोदींवर हल्ला
देशावर तुकडे तुकडे गँगची सत्ता; तुषार गांधींचा मोदी-शाहांना टोला
त्यांनी इटलीवरून येत नागरिकत्व घेतलं, इतरांना रोखतायत; भाजप नेत्याचा सोनिया गांधींना टोला
दिल्लीतल्या हिंसाचाराला काँग्रेस नेतृत्व जबाबदार : अमित शाह
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement