एक्स्प्लोर
जम्मू-काश्मीरमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्याकडे आधार कार्ड!
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बारामूला पोलिसांनी अब्दुल रहमान नावाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दहशतवाद्याकडे आधार कार्ड सापडला आहे. पोलिसांनी या आधार कार्डचा तपास सुरु केला असून, दहशतवाद्याकडे आधार कार्डवर 647856225315 हा क्रमांक आहे.
दहशतवाद्याकडे सापडलेल्या आधार कार्डवर अब्दुल रहमान या दहशदवाद्याचा फोटो आहे, मात्र नाव नाही. अब्दुल रहमानला बनावट आधार कार्ड कसा मिळाला, याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. अब्दुल रहमान पाकव्याप्त काश्मीरमधील पुँछ भागातील रहिवाशी आहे.
दहशतवादी अब्दुल रहमानला शुक्रवारी संध्याकाळी बारामूलाच्या बाजीबलमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं. अब्दुल रहमान जैश-ए-मोहम्मद या दहशदवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळते आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पठाणकोट हल्ल्यामध्येही अब्दुल रहमानचा सहभाग होता. पोलीस या सर्व बाबींची सखोल चौकशी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement