एक्स्प्लोर
हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा; वाजपेयी-हळव्या मनाचे कवी आणि पत्रकार
दरम्यान, राजकारणी म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांची जेवढी ओळख आहे, तेवढेच ते कवी म्हणूनही परिचित आहेत.

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. वाजपेयींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती दिल्लीतील एम्स रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. किडनी संसर्गामुळे वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एम्स रुग्णालयातील डॉक्टर रणदीप गुलेरिया यांची टीम सध्या वाजपेयींवर उपचार करत आहे. दरम्यान, राजकारणी म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांची जेवढी ओळख आहे, तेवढेच ते कवी म्हणूनही परिचित आहेत. अटल बिहारी वाजपेयी हे पत्रकारही होते. पत्रकार आणि राजकारणी असलेल्या अटलीजींनी आपल्या काव्य साधनेत कधीही खंड पडू दिला नाही. पत्रकार वाजपेयींचा राजकारणात प्रवेश राजकारणात येण्याआधी अटल बिहारी वाजपेयी पत्रकार होते. पण काश्मीरमध्ये लागू असलेल्या परमिट सिस्टमला विरोध करण्यासाठी जेव्हा डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी काश्मीरमध्ये गेले, तेव्हा पत्रकार म्हणून अटल बिहारी वाजपेयीच त्यांच्यासोबत होते. परंतु नजरकैदेतच श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू झाल्यानंतर अटल बिहारी वाजेपयी यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. अटल बिहारी वाजपेयी यांची कवी म्हणून असलेली ओळख ही त्यांच्या उत्तम आणि दर्जेदार कवितांमुळेच आहे. त्यांच्या कवितेत विविध रंग होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी अनेक कविता रचल्या. खुद्द पंतप्रधान मोदी यांनीही त्यांच्या कवितांच्या काही ओळी वाचून दाखवल्या आहेत. टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी? अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी। हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ। गीत नया गाता हूँ। त्यांच्या कवितांमध्ये देशप्रेम, माणुसकी, प्रेमासह आयुष्याचं सत्य याचा समावेश होता. उदाहरणार्थ त्यांची 'ऊँचाई' ही कविता मेरे प्रभु! मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना, गैरों को गले न लगा सकूँ, इतनी रुखाई कभी मत देना। संसदेत वाजपेयी जेव्हा आपल्या कवितांद्वारे उत्तर द्यायचे, तेव्हा विरोधकांना गपगार करायचे. अटल बिहारी वाजपेयी जसे कवितांमध्ये दिसायचे तसेच वैयक्तिक आयुष्यातही आहेत. निर्मळ हृदयाचे आणि एक उदार राजकारणी अशी म्हणून आजही त्यांचा सन्मान केला जातो. मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं मैं जी भर जिया, मैं मन से मरुँ लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरुँ?
आणखी वाचा























