एक्स्प्लोर

'पॉक्सो'बाबत अभूतपूर्व निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींना झटका, हायकोर्टाच्या नियमित न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस मागे

न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची मुंबई उच्च न्यायालयातील नियमित न्यायमूर्तीपदावर नेमणूक करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियममध्ये करण्यात आली. परंतु आता ती मागे घेण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पॉक्सो कायद्याबाबत निकाल देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला झटका बसला आहे. पुष्पा गनेडीवाला यांची हायकोर्टाच्या नियमित न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस मागे घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियमने हा निर्णय घेतला आहे.

13 फेब्रुवारी 2019 मध्ये न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदावर वर्णी लागली होते. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयातील नियमित न्यायमूर्तीपदावर नेमणूक करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियममध्ये करण्यात आली. परंतु आता ती मागे घेण्यात आली आहे. या संदर्भातील निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने 'स्किन टू स्किन'बाबत दिलेल्या निकालाबाबत सर्व स्तरातून तीव्र पडसाद उमटताना दिसले. सर्वोच्च न्यायालयाने या निकालाला स्थगिती दिल्यानंतर अवघ्या काही तासांत न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी त्याच आशयाचा दिलेला आणखी एक निकाल समोर आला. त्यामुळे अखेरीस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदालाही त्याची दखल घ्यावी लागली आहे. मुंबई उच्च न्यायालयातूनच सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या दोन न्यायमूर्तींनी यावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्या तीन सदस्यांनी गनेडीवाला यांच्या नावाची नियमित न्यायमूर्तीपदासाठी शिफारस केली होती, त्यातील एका सदस्याला ती मागे घेण्याबाबत तयार करण्यात आलं आहे. तसेच सरन्यायाधीश शरद बोबडे जे सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजिमचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची हायकोर्टाच्या नियमित न्यायमूर्तीपदावरील निवड मागे घेण्याची मागणी केली आहे. याच दोन न्यायमूर्तींनी जानेवारी 2020 मध्ये गनेडीवाला यांच्या झालेल्या निवडीलाही विरोध केल्याचं बोललं जात आहे.

न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची 13 फेब्रुवारी 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती पदावर नेमणूक करण्यात आली. त्याआधी साल 2007 मध्ये त्यांची थेट मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर नागपूर सत्र न्यायालय, नागपूर कौटुंबिक वाद कोर्ट, एमजेएच्या सहसंचालक, नागपूर सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश, मुंबई सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश, रजिस्ट्रार जनरल अशी विविध पदं भूषवली आहेत.

न्यामूर्ती गनेडीवाला यांनी दिलेला निकाल न्यायमूर्ती गनेडीवाला यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे की, "एखाद्या लहान मुलीचा हात पकडणे किंवा पॅण्टची चेन उघडणे ही गोष्ट लैंगिक शोषणाअंतर्गत येत नाही. पॉक्सो अंतर्गत या गोष्टींना लैंगिक शोषण म्हणता येणार नाही." "बाल लैंगिक अत्याचार सिद्ध होण्यासाठी स्किन-टू-स्किन म्हणजेच शरीराचा शरीराला थेट स्पर्श होणं आवश्यक आहे. केवळ शरीराशी चाळे करणे किंवा शरीराला अजाणतेपणी केलेला स्पर्श हा लैंगिक अत्याचारात मोडता येणार नाही," या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas : Ajit Pawar यांचं कौतुक, धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल; सुरेश धस नेमकं काय म्हणाले?Latur Walik Karad Wife Bunglow : वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने लातूरमध्ये बंगलाABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 29 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh On Hotel CCTV :आरोपींसोबत API, हॉटेलमधील CCTV, 50 दिवसांनी धनंजय देशमुख म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन,अर्थसंकल्पाकडून आशा 
अर्थसंकल्पाकडून आशा,भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन 
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Walmik Karad Wife Property: लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
Embed widget