PM SVANidhi Yojana म्हणजे काय? किती कर्ज मिळणार? अर्ज कसा करावा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
PM Swanidhi Yojana Online Application : देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने 2020 मध्ये PM स्ट्रीट व्हेंडर्स स्वावलंबी निधी योजना सुरू केली.
PM SVANidhi News : समाजातील विविध घटकांना लक्षात घेऊन, देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी, तसेच कष्टकरी जनतेला महामारीच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने स्वावलंबी निधी सुरू केला आहे. 2020 मध्ये PM स्ट्रीट व्हेंडर्सची (PM Swanidhi) ही योजना सुरू करण्यात आली.
या योजनेद्वारे, नियमित परतफेडीवर 7% दराने व्याज अनुदानासह रु. 10,000 पर्यंत परवडणारे खेळते भांडवल कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
या योजनेअंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्जावर कोणतेही अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. या योजनेंतर्गत, कर्ज देणाऱ्या संस्थांना पोर्टफोलिओच्या आधारे श्रेणीबद्ध हमी संरक्षण मिळते. हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही हमी द्यावी लागणार नाही. म्हणजेच काहीही गहाण ठेवावे लागणार नाही.
50 लाख विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य
- या अंतर्गत 50 लाख पथारी विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे.
- 24 मार्च 2020 रोजी किंवा त्यापूर्वी व्यवसाय करणारे स्ट्रीट व्हेंडर या कर्जासाठी अर्ज करू शकतात.
- रस्त्यावरील विक्रेत्यांची वेळेवर परतफेड करून 20,000 आणि 50,000 रुपयांचे कर्ज दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यात मिळू शकते.
- या योजनेंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी 100 रुपये प्रति महिना या दराने डिजिटल व्यवहार करण्यासाठी 1,200 रुपयांपर्यंतचा कॅश बॅक देखील मिळतो.
- मात्र, या योजनेसाठी मार्च 2022 पर्यंतच कर्ज घेता येईल. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आत्ताच अर्ज करा.
कर्जाची परतफेड सात हप्त्यांमध्ये करावी लागेल
- पेपरलेस कर्ज प्रक्रियेसाठी एंड-टू-एंड सेवेअंतर्गत एकात्मिक IT प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. योजनेचे प्रशासन करण्यासाठी SIDBI ची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- या योजनेंतर्गत कर्जदारांना एका वर्षात सात हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्यांना 7% वार्षिक व्याज अनुदान म्हणून हस्तांतरित केले जाईल.
PM-Svanidhi साठी अर्ज कसा कराल?
- तुम्हालाही या कर्जासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही pmsvanidhi.mohua.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता.
- वेबसाईटवर, तुम्हाला 10 हजार, 20 हजारांसाठी अर्ज करण्यासाठी लिंक्स आणि वरच्या भागातच शिफारस पत्र मिळेल.
- तेथे क्लिक करून, तुम्ही तुमचा फोन नंबर प्रविष्ट कराल आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. मात्र, हा फोन नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा.
- आसाम आणि मेघालयातील रहिवाशांसाठी या भागात वेगळी लिंक दिली आहे.
आतापर्यंत किती जणांना कर्ज मिळाले ?
केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या मुदतीच्या कर्जासाठी 42 लाख 95 हजार 319 पात्र अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 32 लाख 8 हजार 594 अर्ज मंजूर झाले आहेत. त्याचबरोबर 28 लाख 47 हजार 531 जणांना कर्ज देण्यात आले असून त्यापैकी 3 लाख 80 हजार 856 जणांनी कर्जाची परतफेड केली आहे. तर द्वितीय मुदतीच्या कर्जासाठी 1 लाख 61 हजार 527 पात्र अर्ज आले असून 1 लाख 16 हजार 281 जणांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 93 हजार 314 जणांना कर्जही मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Supreme Court : सुनावणीदरम्यान 'मुन्नाभाई MBBS'चा उल्लेख! जाणून घ्या काय आहे प्रकरण?
- Russia Attack On Ukraine : 'उद्या रशिया युक्रेनवर हल्ला करणार', युक्रेनच्या राष्ट्रपतींची फेसबुक पोस्ट
- Ukraine : युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेसह अनेक मित्र देश एकत्र, व्हाईट हाऊसचा दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha