एक्स्प्लोर
राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नातू कनू गांधी पत्नीसह वृद्धाश्रमात!
नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्पिता महात्मा गांधींचे नातू हलाखीत जीवन जगत आहे. गांधीजींचे नातू कनू भाई आणि त्यांची पत्नी दिल्लीच्या गुरू वृद्धाश्रमात राहत आहेत.
केंद्रीय मंत्री महेश शर्मा य़ांनी दिल्लीतल्या वृद्धाश्रमाला भेट देऊन कनु गांधींची विचारपूस केली. महात्मा गांधींचे तिसरे पुत्र रामदास यांचे कनू गांधी हे एकुलते एक पुत्र आहेत.
87 वर्षांचे कनू गांधींनी पंतप्रधान मोदींशी फोनवर गुजरातीमध्ये संवाद साधला. गुजरात आणि साबरमती आश्रम गांधींच्या आदर्शांवर चालत नसल्याची खंत कनू गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडे बोलून दाखवली. शिवाय मोदींना भेटण्याची इच्छा असल्याचंही सांगितलं.
वयाच्या 17 व्या वर्षांपर्यंत कनू गांधींनी महात्मा गांधीजींसोबत प्रवास केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement