700 कोटी खर्चून मेरठमध्ये उभारणार क्रीडा विद्यापीठ, पंतप्रधानांच्या हस्ते आज पायाभरणी
आज पंतप्रधानांच्या हस्ते मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाचा पायाभरणी सोहळा संपन्न होणार आहे. मेरठमध्ये 700 कोटी रुपये खर्चून या क्रिडा विद्यापीठाची निर्मिती केली जाणार आहे.
sports university : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधानांच्या हस्ते मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाचा पायाभरणी सोहळा संपन्न होणार आहे. मेरठमध्ये या क्रीडा विद्यापीठाची निर्मिती केली जाणार आहे. 700 कोटी रुपये खर्चून हे विद्यापीठ उभारले जाणार आहे. पंतप्रधानांच्या मेरठ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने देखील योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.
मेरठमध्ये क्रीडा विद्यापीठाची स्थापना करुन क्रिडा संस्कृतीला चालना देण्यात येणार आहे. क्रीडा संसाधनांना जागतिक दर्जीचे बनवण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला जाणार आहे. या विद्यापीठात खेळाच्या संदर्भात विविध अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. यामध्ये खेळमध्ये पदवी, पदविका, तसेच डिप्लोमा, पीएचडी करता येणार आहे.
मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठात काय खास असेल
1) तब्बल 700 कोटी रुपयांचा खर्च करुन मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ बांधले जाणार आहे
2) हे नवीन विद्यापीठ आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल
3) एकाच वेळी 1 हजार 80 खेळाडूंना प्रशिक्षण देता येईल
4) अॅथलेटिक्ससारख्या मैदानी खेळांसाठी 25 ते 30 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था असेल
5) कुस्ती, खो-खो, कबड्डी या खेळांसाठी 5 हजार क्षमतेचा हॉल बांधण्यात येणार आहे
6) विद्यापीठात सिंथेटिक हॉकी मैदान, फुटबॉल मैदान असणार आहे
7) बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, लॉन टेनिस कोर्ट देखील असेल
8) नेमबाजी आणि तिरंदाजीसाठी शूटिंग रेंजही असेल
9) सिंथेटिक रनिंग स्टेडियम, स्विमिंग पूल अशा सुविधाही या विद्यापीठात असतील
कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा कार्यक्रम
सकाळी 11.35 वाजता पंतप्रधान मोदी मेरठमधील आर्मी हेलिपॅडवर उतरतील
सकाळी 11.50 वाजता ते मेरठच्या हुतात्मा स्मारकावर पोहोचतील
सकाळी 11.50 वाजता हुतात्मा स्मारक, अमर जवान ज्योती आणि राज्य स्वातंत्र्य संग्राम संग्रहालयाला भेट
दुपारी 12.15 वाजता औघडनाथ मंदिराचे दर्शन घेणार
दुपारी 1 वाजता सलवा येथील मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करतील
पायाभरणीनंतर मोदी जाहीर सभेला संबोधित करतील
देशातील आणि राज्यातील खेळाडूंना भेटून, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत
दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीकडे रवाना होतील
महत्त्वाच्या बातम्या: