एक्स्प्लोर
मोदी रोज चार लाखांचे मशरुम खाल्ल्यामुळे गोरे : अल्पेश ठाकोर
गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांना रोज चार लाखांचे पाच तैवानी मशरुम खाण्याची सवय असल्यामुळे ते गोरे आणि तंदुरुस्त झाले, असा दावा अल्पेश ठाकोर यांनी केला.
![मोदी रोज चार लाखांचे मशरुम खाल्ल्यामुळे गोरे : अल्पेश ठाकोर PM Narendra Modi was dark, became fair after eating Taiwanese mushrooms : OBC Leader Alpesh Thakor latest update मोदी रोज चार लाखांचे मशरुम खाल्ल्यामुळे गोरे : अल्पेश ठाकोर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/12211204/Alpesh-Thakore.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रंग सावळा होता, मात्र दररोज चार लाख रुपयांचे पाच मशरुम खाल्ल्यामुळे त्यांचा रंग उजळला, असा दावा गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची तारीख अद्याप समजलेली नाही.
मोदी तैवानहून आयात केलेले पाच मशरुम रोज खातात. एका मशरुमची किंमत 80 हजार रुपये आहे. म्हणजेच मोदी रोज चार लाख रुपयांचे मशरुम खातात. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांना ही सवय असल्यामुळे ते गोरे आणि तंदुरुस्त झाले, असा दावाही अल्पेश ठाकोर यांनी केला.
अल्पेश ठाकोर यांच्या भाषणातील भाग :
'मला कोणीतरी सांगितलं, मोदी साहेब जे खातात, ते तुम्ही खाऊ शकत नाही, कारण ते गरिबांचं खाणं नाही. मी विचारलं असं काय खातात? ते म्हणाले मोदीजी मशरुम खातात. मी म्हटलं त्यात काय? मशरुम तर इकडेही मिळतात. तर ते म्हणाले, मोदी खातात ते मशरुम तैवानहून येतात. त्या एका मशरुमची किंमत 80 हजार रुपये आहे. मोदी साहेब रोज पाच मशरुम खातात. गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासूनच. मी म्हटलं तरीच.. ते माझ्यासारखे काळे होते, आता गोरे कसे झाले? कारण मी 35 वर्ष जुना फोटो पाहिला होता. तेव्हा ते काळे होते आणि आता लाल टॉमेटोसारखे गोरेपान कसे झाले? मजबूतही झाले आहेत. जे पंतप्रधान दररोज चार लाखांचे मशरुम खातात, त्यांना रोटी-चावल कसे आवडतील. तो फक्त एक दिखावा आहे. जे महिन्याला एक कोटी 40 लाखांचे मशरुम खातात, त्यांचे कार्यकर्ते किती पैसा खात असतील विचार करा.'
https://twitter.com/ANI/status/940535639463796737
गुजरातच्या विधानसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा गुरुवारी होणार आहे. अल्पेश ठाकोर काँग्रेसच्या तिकीटावर राधनपूरच्या विधानसभा जागेसाठी निवडणूक लढवत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)