भारतात ट्विटरवर मोदींचा दबदबा, नोव्हेंबर महिन्यात 76.6 लाख एन्गेजमेन्ट्स
इंडियन ट्विटर एन्गेजमेन्ट्स रॅंकिंग्जच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ट्विटरवर (Twitter) दबदबा असल्याचं सिध्द झालंय. बॉलिवूडमध्ये सोनू सूद तर उद्योग क्षेत्रात आनंद महिंद्रांनी बाजी मारलीय
नवी दिल्ली: भारतात सोशल मीडिया ट्विटरवर मोदींचा दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिध्द झालंय. नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या ट्वीट्सना 76.6 लाख एन्गेजमेन्ट्स मिळाल्याचं समोर आलंय. अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म ट्वीटीट (Twitteet) च्या नोव्हेंबरच्या ओव्हरऑल इंडियन ट्विटर एन्गेजमेन्ट्स रॅंकिंग्जच्या माध्यमातून ही गोष्ट स्पष्ट झालीय.
पंतप्रधानांच्या ट्विटर हॅन्डलवर सर्वाधिक म्हणजे 76.6 लाख ट्वीट्स एन्गेजमेन्ट्स झाले आहेत. अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म ट्वीटीट (Twitteet) च्या अहवालातून ही माहिती उघडकीस आली आहे. ट्वीटीट (Twitteet) राजकारण, पत्रकारिता, बॉलिवूड, खेळ, सेलिब्रेटिज आणि उद्योग अशा अनेक क्षेत्रामध्ये ट्वीट एन्गेजमेन्ट्सच्या आधारे रॅंकिंग ठरवते.
टॉप 4 मध्ये कोण आहे? ओव्हरऑल इंडियन ट्विटर एन्गेजमेन्ट्स रॅंकिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम क्रमांकावर आहेत. त्यानंतर 27.3 लाख ट्वीट एन्गेजमेन्ट्सने गृहमंत्री अमित शाह हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 26.6 ट्विटर एन्गेजमेन्टसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या नंबरला पत्रकार दिपक चौरासिया आहेत. त्यांच्या ट्वीट्स एन्गेजमेन्ट्स 25.08 लाख इतके आहे.
कोण कुठल्या क्षेत्रात अव्वल?
1. राजकारण: नरेंद्र मोदी- 7665669 ट्विटर एन्गेजमेन्ट्स
2. बॉलिवूड स्टार्स: सोनू सूद- 1384353 ट्विटर एन्गेजमेन्ट्स
3. उद्योग: आनंद महिन्द्रा- 400105 ट्विटर एन्गेजमेन्ट्स
4. क्रिकेट: विराट कोहली- 1776838 ट्विटर एन्गेजमेन्ट्स
5. स्पोर्ट्स स्टार (नॉन क्रिकेट): विजेंदर सिंह- 353231 ट्विटर एन्गेजमेन्ट्स
6. टीव्ही स्टार: सिद्दार्थ शुक्ला- 340036 ट्विटर एन्गेजमेन्ट्स
7. पत्रकारिता: दिपक चौरसिया- 2508471 ट्विटर एन्गेजमेन्ट्स
8. फाउंडर्स: कुणाल शाह- 72355 ट्विटर एन्गेजमेन्ट्स
9. कॉमेडियन्स: कुणाल कामरा- 1853563 ट्विटर एन्गेजमेन्ट्स
10. प्रादेशिक सिनेमा स्टार्स: महेश बाबू- 914669 ट्विटर एन्गेजमेन्ट्स
महत्वाच्या बातम्या:
- Mann Ki Baat : '2020 वर्षानं आपल्याला खूप काही दाखवलं तसंच शिकवलं' - पंतप्रधान मोदी
- '...तरीही पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक', संजय राऊतांची 'रोखठोक' टीका
- कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी आणण्यासाठी हायकोर्टात याचिका
- 79 वर्षांपूर्वी लतादिदींनी गायलं रेडिओवर पहिलं गाणं, आठवण सांगत केलं ट्वीट