एक्स्प्लोर

Mann Ki Baat : '2020 वर्षानं आपल्याला खूप काही दाखवलं तसंच शिकवलं' - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या अंजली आणि मुंबईच्या अभिषेक यांनी पाठवलेल्या संदेशाचं वाचन करत त्यांचं कौतुक केलं.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 27 डिसेंबर रोजी त्यांनी या वर्षातील शेवटच्या 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह त्यांनी नवीन वर्षात 2021 मध्ये भारत यशाच्या नव्या शिखरावर असेल आणि जगात भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल, अशी कामना आपण करुयात असा संदेश दिला. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या अंजली आणि मुंबईच्या अभिषेक यांनी पाठवलेल्या संदेशाचं वाचन करत त्यांचं कौतुक केलं. 2020 या वर्षानं आपल्याला खूप काही दाखवलं आहे तसंच शिकवलं आहे, असंही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, माझ्यासमोर तुमची असंख्य पत्रे आहेत. आपण mygovindia वर पाठविलेल्या सूचनासुद्धा माझ्यासमोर आहेत. अंजली यांनी कोल्हापूरहून लिहिले आहे की, आपण नेहमीच एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो, पण यावेळी आपण आपल्या देशाला शुभेच्छा देऊया, त्याचे अभिनंदन करूया, असं मोदींनी म्हटलं. तर मुंबईच्या अभिषेक जी यांनी नमोॲप वर एक संदेश पाठवला आहे. त्यांनी लिहिले आहे की 2020 ने आम्हाला जे काही दाखवले, जे शिकवले त्याचा कधी विचार देखील केला नव्हता. त्यांनी कोरोनाशी संबंधित सर्व गोष्टी लिहिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण #AatmaNirbharBharat ला पाठिंबा देत आहोत, पण आमच्या उत्पादकांनीही ते तयार करत असलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे. Zero effect, zero defect या कल्पनेसह काम करण्याची ही योग्य वेळ आहे.

भारतातील बिबट्यांची संख्या वाढली मोदींनी सांगितलं की, आता मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला अभिमान देखील वाटेल. 20141-18 दरम्यान भारतातील बिबट्यांची संख्या 60 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. 2014 मध्ये देशात बिबट्यांची संख्या सुमारे 7,900 होती, तर 2019 मध्ये ही संख्या वाढून 12,852 झाली. "देशातील बऱ्याच राज्यांत, विशेषत: मध्य भारतात, बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अव्वल स्थानी आहेत. ही एक मोठी कामगिरी आहे, असं मोदी म्हणाले.

2014 पासून सतत करत आहेत मन की बात पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 72 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Jaipur CJP Team Attacked: सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाणीनंतर अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप; आता गाववाले म्हणतात, त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या
सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाणीनंतर अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप; आता गाववाले म्हणतात, त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Embed widget