पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता राष्ट्राला संबोधित करणार असून त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी देशाला काय संदेश देणार, हा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी दुपारी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस संकटात पंतप्रधान मोदींनी याआधीही अनेकदा देशाला संबोधित केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दुपारी ट्वीट केलं आहे की, 'आज संध्याकाळी 6 वाजता देशासाठी एक संदेश देणार आहे. तुम्ही नक्की या.'
पंतप्रधान मोदींचं ट्वीट :
आज शाम 6 बजे राष्ट्र के नाम संदेश दूंगा। आप जरूर जुड़ें।
Will be sharing a message with my fellow citizens at 6 PM this evening. — Narendra Modi (@narendramodi) October 20, 2020
दरम्यान, देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशातच पंतप्रधान सतत नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला मंत्रही दिला आहे की, 'जबतक दवाई नही, तबतक ढिलाई नही.' म्हणजेच, जोपर्यंत औषध नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे.
देशातील अर्थचक्राला चालना देण्यासाठी आणखी एक रिलीफ पॅकेज?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं की, मोदी सरकारने अर्थव्यवस्थेवर कोरोना व्हायरस महामारीचा प्रभाव आणि त्यामुळे जीडीपीमध्ये संभाव्य घट यासंदर्भातील आकलन सुरु केलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आर्थिक चक्राला चालना देण्यासाठी आणखी एका रिलीफ पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.' त्यामुळे आज देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी देशासाठी आणखी एका रिलीफ पॅकेजची घोषणा करणारा का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ : पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधणार
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत अनेकदा देशाला संबोधित केलं आहे. ज्यामध्ये जनता कर्फ्यू, 21 दिवसांचा लॉकडाऊन, कोरोना वॉरियर्ससाठी दिवे लावण्याचंही आवाहन मोदींना देशाला संबोधित करताना केलं होतं. याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात अनेकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. काही दिवसांपूर्वी पंरप्रधानांनी देशात सुरु असलेल्या कोरोनावरील लसींच्या ट्रायलसंदर्भात बैठक घेतली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :