एक्स्प्लोर

PM Modi On Delhi Blast : 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा

PM Modi On Delhi Blast : सोमवारी दिल्लीत झालेल्या कार स्फोटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

PM Modi On Delhi Blast : देशाची राजधानी दिल्ली काल ( सोमवारी 10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटाने (Delhi Bomb Blast) हादरून गेली. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये (Delhi Car Blast) सोमवारी सायंकाळी सुमारे 6.52 वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर राजधानीतील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. दिल्ली पोलिस, स्पेशल सेल आणि एनएसजीच्या टीम्स अलर्ट मोडवर आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आजपासून दोन दिवस भूतानच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटाबाबत भाष्य केलं. या षडयंत्रामागे जे कोणी आहेत, त्यांच्याविरोधात कठोर पावलं उचलली जातील,षडयंत्र रचणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, आमच्या एजन्सी या घटनेच्या मुळाशी जातील आणि जे कोणी यामध्ये सहभागी आहेत, त्यांना धडा शिकवला जाईल असं पंतप्रधान  भूतानमध्ये म्हणाले आहेत.

PM Modi On Delhi Blast :  कटकारस्थानाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सर्व एजन्सीचा तपास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान दौऱ्यादरम्यान दिल्लीतील भीषण घटनेबद्दल गहिवरलेल्या शब्दांत शोक व्यक्त केला आणि पीडित कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, “मी अत्यंत दुःखी मनाने भूतानमध्ये आलो आहे. १० नोव्हेंबरच्या संध्याकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.” पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ते संपूर्ण रात्रभर तपास यंत्रणांशी संपर्कात होते आणि आवश्यक ते सर्व निर्देश दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या कटकारस्थानाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सर्व एजन्सी तपास करत आहेत, आणि दोषींना अजिबात सोडले जाणार नाही. ज्या कुटुंबांनी या घटनेत आपले प्रियजन गमावले आहेत, त्या प्रत्येक कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे.” त्यांनी शोकाकुल परिवारांना धीर दिला आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. यासोबतच, पंतप्रधानांनी सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांना त्वरित आणि निष्पक्ष तपास करून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला नियोजित दौरा कायम ठेवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा भूतानचा चौथा दौरा असून, या भेटीचा मुख्य उद्देश भारत आणि भूतान यांच्यातील मैत्री व भागीदारी अधिक दृढ करणे हा आहे. दरम्यान, एकीकडे दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली असतानाच पीएम मोदी भूतान दौऱ्यावर गेल्याने विरोधकांनी त्यांच्या जोरदार हल्लाबोल केलाय.

PM Modi Bhutan Tour: चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक संयुक्तपणे 1,020 मेगावॅट क्षमतेच्या पुनात्संगचू-२ जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी भूतानला 1,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करतील. तसेच ते भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, मोदी भूतानमध्ये सुरू असलेल्या जागतिक शांती प्रार्थना महोत्सवातही सहभागी होतील. पंतप्रधान मोदी या ठिकाणी भेट देऊन शांतीसाठी प्रार्थना करतील.

PM Modi Bhutan Tour Schedule: पंतप्रधान मोदींच्या भूतान दौऱ्याचे वेळापत्रक

11 नोव्हेंबर

- पंतप्रधान मोदी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतील.

- 1,020 मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचू-II जलविद्युत प्रकल्पाचे संयुक्त उद्घाटन करतील.

-भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या समारंभाला उपस्थित राहतील.

- जागतिक शांती प्रार्थना महोत्सवात सहभागी होतील आणि भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांना दर्शन देतील.

12 नोव्हेंबर

- पंतप्रधान मोदी भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांची भेट घेतील.

- ऊर्जा, रेल्वे, रस्ते कनेक्टिव्हिटी आणि विकास प्रकल्पांवरील सहकार्याबाबत चर्चा होईल.

- भारत भूतानला 1,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत देईल.

- भूतानच्या 13 व्या पंचवार्षिक योजनेसाठी सहकार्य आणि भागीदारीविषयीही चर्चा केली जाईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मोठी बातमी! भाजकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मोठी बातमी! भाजकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
Embed widget