PM Modi On ABP : पंतप्रधान नरेंद्र मोदींची Exclusive मुलाखत, पाहा सायं.7.58 वाजता फक्त एबीपी माझावर
PM Modi Exclusive on ABP : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यांनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली आहे. ही मुलाखत आज सायंकाळी 7.58 वाजता पाहायला मिळणार आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर एबीपी माझाला (#PMModiOnABP) खास मुलाखत दिली आहे. यंदाची निवडणूक कशाप्रकारे खास होती. यासाठी भाजपने काय-काय मेहनत घेतली. निवडणुकीत कोणत्या गोष्टींवर खास लक्ष दिलं याबाबत माहिती देताना विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यांनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली आहे. ही मुलाखत आज सायंकाळी 7.58 वाजता पाहायला मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास मुलाखत
आज रात्री एबीपीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वात मोठी मुलाखत पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान मोदी यावेळी भ्रष्टाचारावर आणखी मोठा हल्ला करणार का? त्याची उत्तरे तुम्हाला मिळतील. तुम्हाला आज सर्व प्रश्नांची उत्तरे खुद्द पंतप्रधान मोदींकडून ऐकायला मिळतील.
पंतप्रधान काय बोलणार याकडे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी यावेळी पाहिलं की माझी पूर्ण यंत्रणा काम करत आहे. कुणीही सुट्टी घेतली नाही, मी सगळ्यांना खूप मोठं टस्क दिलं आहे आणि त्यांनी असंच काम केलं आहे, जसं की आमचं सरकार आजच तयार झालं आहे. याचा अर्थ माझी टीम खूप उत्साही असून त्यांच्यामध्ये ऊर्जा भरलेली आहे, ज्यामुळे मी खूप वेगाने काम करु शकेन. आज आपण एक लाख कोटींच मॅन्यूफॅक्चरिंग करत आहोत, आपण 21 हजार कोटी रुपये एक्सपोर्ट केले आहेत, याचा अर्थ असा की, भारतात सामर्थ्य आहे. ब्रम्होससोबत जे झालं ते झालं नसतं तर, आजपासून 10 वर्षांआधीच ब्रम्होस आले असते.
पंतप्रधान मोदींनी मानले आभार
त्यांनी पुढे सांगितलं की, 'मिशन ब्राह्मोस' बाबतीत खुलाशावर पंतप्रधान मोदींनी एबीपी माझाशी संवाद साधला. हा विषय मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. यूपीए सरकारच्या काळात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात वर्षानुवर्षे रखडली. एबीपी माझाला दिलेल्या सुपर एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, जर हे ब्रह्मोसच्या बाबतीत घडलं नसतं, तर आम्ही 10 वर्षांपूर्वी लाखो आणि करोडो ब्रह्मोस निर्यात केले असते, अनेक वर्षापूर्वीच्या नवीन ब्रम्होस भारताला मिळाले असते. पंतप्रधान मोदी यांनी मुलाखतीतल अशा सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहे. पंतप्रधान मोदी नक्की काय म्हणाले आहेत, हे तुम्हाला रात्री 7.58 वाजता फक्त एबीपी माझावर पाहता येईल.
लाईव्ह पाहा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत