एक्स्प्लोर

PM Modi : सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक, महत्त्वाच्या करारांवर केल्या स्वाक्षऱ्या

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये सोमवारी हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली.

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी (11 सप्टेंबर) रोजी सौदी अरेबियाचे (Saudi Arebia) क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल- सऊद यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या द्विपक्षीय बैठकीमध्ये व्यापार आणि सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि सौदी अरेबियाच्या स्ट्रॅटेजिक  पार्टनरशिप काऊन्सिलच्या पहिल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या देखील केल्या आहेत. तर या बैठकीमध्ये सामंजस्य करारावर देखील स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. जी-20 परिषद संपल्यानंतर मोहम्मद बिन सलमान हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. 

सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात स्वागत करण्यात आले. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली.  स्वागत झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की, मी भारतात आल्याचा खूप आनंद आहे. जी- 20 परिषदेसाठी भारताचे अभिनंदन करतो. या परिषदेमध्ये करण्यात आलेल्या अनेक घोषणांचा फायदा जगाला होणार आहे. तसेच या दोन्ही देशांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र मिळून काम केले जाईल. 

या मुद्द्यांवर झाली चर्चा

द्विपक्षीय बैठकीदरम्यान राजनैतिक, संरक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, आधीपेक्षा आता भारत आणि सौदी अरेबियाचे संबध आणखी चांगले होतील. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स यांनी एकत्रित या बैठकीविषयी माहिती दिली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था म्हणून भारत आणि सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिले जाते. त्यामुळे शांतता आणि स्थिरतेसाठी आमचा परस्पर समन्वय आवश्यक आहे. दोन्ही देशांचे संबंध आणखी वाढण्यासाठी आम्ही अनेक योजनांविषयी चर्चा केली. तसेच आजची बैठक ही दोन्ही देशांचे संबंध आणखी घट्ट होण्यास मदत होईल. 

भारत-मिडल ईस्ट-युरोप कॉरिडॉरवरही चर्चा

भारत - मिडल ईस्ट- युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरवरही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. यावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जी-20 परिषदेमध्ये आम्ही कॉरिडॉर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कॉरिडॉर केवळ दोन देशांना जोडणार नाही, तर आशिया, पश्चिम आशिया आणि युरोपमधील अनेक देशांना जोडणार आहे. तसेच या देशांमधील आर्थिक विकास आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी देखील हा कॉरिडॉर महत्त्वाचा ठरु शकतो. सौदी अरेबिया हा  पश्चिम आशियातील भारताची प्रमुख धोरणात्मक भागीदारी असणार देश आहे. मागील काही वर्षांमध्ये दोन्ही देशांच्या संबंध आणखी घट्ट झाले आहेत. 

हेही वाचा : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Embed widget