(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Veer Baal Diwas: आता दरवर्षी 26 डिसेंबरला 'वीर बाल दिवस'; पंतप्रधान मोदींची घोषणा
Veer Baal Diwas: देशात आता दरवर्षी 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा केला जाणार आहे. याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घोषणा केली आहे
Veer Baal Diwas: देशात आता प्रत्येक वर्षी 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा केला जाणार आहे. याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घोषणा केली आहे.पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, आज, श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या जयंतीनिमित्त प्रकाश पर्वाच्या पावन प्रसंगी मला हे सांगताना अत्यंत अभिमान वाटत आहे की, यावर्षीपासून 26 डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून साजरा केला जाईल. ही साहिबजाद्यांच्या साहसाला एक आदरांजली आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
Today, on the auspicious occasion of the Parkash Purab of Sri Guru Gobind Singh Ji, I am honoured to share that starting this year, 26th December shall be marked as ‘Veer Baal Diwas.’ This is a fitting tribute to the courage of the Sahibzades and their quest for justice.
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2022
‘Veer Baal Diwas’ will be on the same day Sahibzada Zorawar Singh Ji and Sahibzada Fateh Singh Ji attained martyrdom after being sealed alive in a wall. These two greats preferred death instead of deviating from the noble principles of Dharma.
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2022
The bravery and ideals of Mata Gujri, Sri Guru Gobind Singh Ji and the 4 Sahibzades give strength to millions of people. They never bowed to injustice. They envisioned a world that is inclusive and harmonious. It is the need of the hour for more people to know about them.
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2022
साहिबजादे जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना या दिवशी हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्याच दिवशी ‘वीर बाल दिवस’ असेल. या दोन महात्म्यांनी धर्माच्या उदात्त तत्त्वांसाठी शत्रूंपुढं न झुकता मृत्यू स्वीकारला होता. माता गुजरी, श्री गुरु गोविंद सिंग जी आणि चार साहिबजादे यांचे शौर्य आणि आदर्श लाखो लोकांना शक्ती देतात. ते कधीही अन्यायापुढे झुकले नाहीत. त्यांनी सर्वसमावेशक आणि सामंजस्यपूर्ण जगाची कल्पना केली. त्यांच्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती मिळणे ही काळाची गरज आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.
आज शीख धर्मियांचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंह यांची जयंती
शीख धर्माचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंह यांची आज जयंती. गुरु गोविंदसिंहजी यांनी मानवकल्याणाची, अन्यायाविरोधात लढण्याची शिकवण दिली. नैतिक मूल्यांचं पालन करण्याचा, फळाची अपेक्षा न ठेवता सत्कार्य करत राहण्याचा त्यांचा संदेश देशाचं आणि अखिल विश्वाचं कल्याण करणारा आहे.