एक्स्प्लोर
Advertisement
गेल्या वर्षी मोदींचं भाषण 55 मिनिटं, तरीही सर्वात छोटं!
गेल्या वर्षी 15 ऑगस्ट 2017 रोजी स्वातंत्र्य दिनाला मोदींनी सर्वात छोटं भाषण देण्याचं वचन 'मन की बात'मधून दिलं होतं. त्यानुसार त्यांनी केवळ 55 मिनिटात भाषण पूर्ण केलं. मोदींचं हे आतापर्यंतचं सर्वात छोटं भाषण आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावरुन आतापर्यंतचं सर्वात मोठं भाषण दिल्यानंतर गेल्यावर्षी सर्वात छोटं भाषण दिलं. 2016 मध्ये मोदींनी 96 मिनिटांचं भाषण केलं होतं, जे आतापर्यंत एखाद्या पंतप्रधानाचं सर्वात मोठं भाषण होतं.
लाल किल्ल्यावरुन मोदींनी आतापर्यंत चार भाषणं केली. 2017 मध्ये 55 मिनिटांच्या भाषणात मोदींनी विविध विषयांवर भाष्य केलं. यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पहिल्या स्वातंत्र्य दिनाला 15 ऑगस्ट 1947 रोजी 72 मिनिटे भाषण केलं होतं.
पंतप्रधान मोदींनी जुलै 2017 मध्ये देशवासियांकडून मागवलेल्या सुचनांनुसार संक्षिप्त भाषण करणार असल्याचं सांगितलं होतं. भाषण जरा जास्त मोठं होत असल्याचं काही पत्रांमध्ये म्हटल्याचं मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितलं होतं. त्यामुळे यावेळी सर्वात छोटं भाषण देण्याचं वचन मोदींनी दिलं होतं. त्यानुसार मोदींनी वचन पूर्ण करत 2014 मध्ये ते पंतप्रधान झाल्यानंतरचं सर्वात छोटं भाषण केलं.
मोदींनी 2014 साली 65 मिनिटे, 2015 साली 86 मिनिटे, 2016 साली 96 मिनिटे आणि 2017 मध्ये सर्वात कमी वेळेत म्हणजे 55 मिनिटांमध्ये भाषण संपवलं. यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात 50 मिनिटांच्या आतच भाषण पूर्ण केलं. तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 30 ते 35 मिनिटे देशाला संबोधलं होतं.
संबंधित बातम्या :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
न्यू इंडियासाठी 'टीम इंडिया'ने एकत्र येण्याची गरज : पंतप्रधान मोदी
शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा देणार: मोदी
नोटाबंदीनंतर 3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट उद्ध्वस्त : पंतप्रधान मोदी
‘ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement