COVID-19 Vaccine : 200 कोटी कोविड लसीकरणाचा आकडा गाठला! PM मोदींचे लस उत्पादकांना पत्र, पत्रात म्हटलंय...
COVID-19 Vaccine : पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लस उत्पादकांना एक कौतुकास्पद पत्र लिहलंय. पत्रात काय म्हटलंय पंतप्रधानांनी? 200 कोटी
COVID-19 Vaccine : कोरोना व्हायरस सोबतच्या (CoronaVirus) युद्धात भारताने नवे स्थान प्राप्त केले आहे. देशाने 200 कोटी लसीकरणाचा आकडा गाठला आहे. भारताने अवघ्या 18 महिन्यांत हा आकडा पार केला. 16 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात आले. देशात आता 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस (Booster Dose) दिला जात आहे, तर 12 वर्षांखालील मुलांनाही लसीकरण केले जात आहे. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली देशात कोरोना प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली. ज्या अंतर्गत भारताने 200 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. महामारीशी झुंज देत 299 कोटी लसीकरणाचे यश संपादन केल्याबद्दल भारताचे जगभरातून कौतुक होत आहे. तर पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लस उत्पादकांना एक कौतुकास्पद पत्र लिहलंय. पत्रात काय म्हटलंय पंतप्रधानांनी?
PM नरेंद्र मोदींनी लिहलेल्या एका पत्रात म्हटलंय...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लिहलेल्या एका पत्रात कौतुक केले. कारण भारताने आपल्या नागरिकांना 200 कोटी डोस देण्याचे कोविड-19 लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे आणि ते म्हणाले, "हे तुमच्यासारख्या नागरिकांच्या प्रयत्नांमुळे झाले आहे, मोदींनी असेही सांगितले की, साथीच्या संकटाच्या काळात भारताच्या या अभूतपू्र्व कामगिरीचा भावी पिढ्यांना अभिमान वाटेल, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली. त्यांनी लिहिले, लसीकरणकर्ते, आरोग्य कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. "जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला भारताने दिलेला वेग आणि कव्हरेज उत्कृष्ट आहे आणि ते तुमच्यासारख्या लोकांच्या प्रयत्नांमुळे आहे," पंतप्रधानांनी पत्रात म्हटले आहे.
देशवासियांना शुभेच्छा
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यात ते म्हणाले, भारताने पुन्हा एकदा इतिहास रचल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, 200 कोटी लसीकरण डोस गाठल्याबद्दल सर्व देशवासियांचे अभिनंदन. भारतातील लसीकरण मोहिमेचे प्रमाण आणि गती अतुलनीय बनवण्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचा अभिमान आहे. यामुळे कोविड-19 विरुद्धच्या जागतिक लढ्याला बळ मिळाले आहे.
भारताने 2 अब्ज कोविड लस डोसचा टप्पा ओलांडला
माहितीनुसार, भारताने आपल्या कोविड-19 लसीकरण मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 98% प्रौढ लोकसंख्येला किमान एक डोस मिळाला आहे, 90% पूर्णपणे लसीकरण झाले आहेत. 3 जानेवारी रोजी या वयोगटासाठी लसीकरण सुरू झाल्यापासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील 82% किशोरांना पहिला डोस मिळाला आहे, तर 68% लोकांना पहिला आणि दुसरा डोस मिळाला आहे. तर 12-14 वर्षे वयोगटातील 81 टक्के लोकांनी त्यांचा पहिला डोस घेतला आहे आणि 56% पूर्णपणे लसीकरण झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, 71% लसीकरण ग्रामीण भागात असलेल्या कोविड लसीकरण केंद्रांमध्ये झाले आहे, तर उर्वरित 29% शहरी भागात झाले आहेत. याव्यतिरिक्त, महिलांना एकूण डोसपैकी 48.9% मिळाले, तर पुरुषांना 51.5 टक्के मिळाले. माहितीनुसार, 'इतरांना' लसीकरणाच्या सर्व डोसपैकी 0.02 टक्के मिळाले. आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, लक्षद्वीप, चंदीगड, तेलंगणा आणि गोवा येथे, 12 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 100% लोकसंख्येला पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे.
भारताने पुन्हा इतिहास रचला
देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर दीड वर्षानंतर, रविवारी, 17 जुलै रोजी भारताने 200 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला. ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, भारताने पुन्हा इतिहास रचला आहे. कोरोना व्हायरसशी युद्धात भारताने नवे स्थान प्राप्त केले आहे. देशाने 200 कोटी लसीकरणाचा आकडा गाठला आहे. भारताने अवघ्या 18 महिन्यांत हा आकडा पार केला. 16 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात आले. देशात आता 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस दिला जात आहे, तर 12 वर्षांखालील मुलांनाही लसीकरण केले जात आहे.
आतापर्यंत किती डोस मिळाले?
24 फेब्रुवारी 2021 - 1 कोटी डोस
29 एप्रिल 2021- 15 कोटी डोस
13 जून 2021- 25 कोटी डोस
7 ऑगस्ट 2021 - 50 कोटी डोस
21 ऑक्टोबर 2021 - 100 कोटी डोस
7 जानेवारी 2022 - 150 कोटी डोस
19 फेब्रुवारी 2022 - 175 कोटी डोस
16 जुलै 2022 - 200 कोटी डोस