Republic Day 2023 : राजस्थानी पगडी, कुर्ता आणि जॅकेट; 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास पेहराव
74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2023) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारताच्या विविधतेचे प्रतीक असलेली बहुरंगी राजस्थानी पगडी परिधान केली.
Republic Day 2023 : पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (26 जानेवारी) 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2023) भारताच्या विविधतेचे प्रतीक असलेली बहुरंगी राजस्थानी (Rajasthan) पगडी परिधान केली. प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नॅशनल वॉर मेमोरियल (National War Memorial) येथे गेले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या पगडीनं अनेकांचे लक्ष वेधले.
नरेंद्र मोदींचा खास पेहराव
प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) खास पेहराव करतात. नरेंद्र मोदी अनेक वेळा विशिष्ट प्रदेशाचा पारंपारिक पोषाख परिधान करतात. यंदा 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी बहुरंगी राजस्थानी पगडी, क्रिम कलरचा कुर्ता, ब्लॅक जॅकेट, पांढऱ्या रंगाचा स्टोल आणि काळे शूज असा पेहराव केला.
Prime Minister Narendra Modi puts down his remarks in the digital Visitor's Book of the National War Memorial in Delhi pic.twitter.com/JAArB8n6r0
— ANI (@ANI) January 26, 2023
स्वातंत्र्य दिन (Independence Day) आणि प्रजासत्ताक दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी खास पेहराव करतात. गेल्या वर्षी, प्रजासत्ताक दिनानिमित्त पीएम मोदींनी केलेल्या पोशाखात उत्तराखंड आणि मणिपूरच्या संस्कृतीची झलक दिसत होती. उत्तराखंडची ब्रह्मकमळ टोपी आणि मणिपूरचे लीरम फी स्टोल त्यांनी परिधान केली होती. मोदींच्या या पेहरावानं देखील अनेकांचे लक्ष वेधले.
2021 मध्ये 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल रंगाची टोपी घातली होती. ही टोपी जामनगरच्या शाही राजघराण्यानं नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिली होती. 2020 मध्ये पीएम मोदींनी भगवी बंधेज टोपी परिधान केली होती.
आपल्या देशात प्रत्येक धर्मात सण साजरे करण्याची परंपरा आहे. परंतू, काही सण असे आहेत जे प्रत्येक देशवासीयांसाठी महत्त्वाचे आहेत. ते देशभर आदराने आणि आपुलकीने साजरे केले जातात. 26 जानेवारी हा देखील असाच एक सण आहे. जो देशाचा राष्ट्रीय सण आहे. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा असो, हा दिवस संपूर्ण देशभक्तीने साजरा करतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. तत्पूर्वी, 26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पुढील 18 वर्षे या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन, देशभर उत्साहाचं वातावरण; विविध कार्यक्रमांचं आयोजन