ISKCON : श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त विशेष नाण्याचं अनावरण आज; जाणून घ्या त्यांच्याबद्दल
Swami Prabhupada : इस्कॉनचे संस्थापक श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 125 रुपयाच्या विशेष नाण्याचं अनावरण करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : इस्कॉनचे संस्थापक श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 125 रुपयाच्या विशेष नाण्याचं अनावरण करण्यात येत आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी 4.30 वाजता संपन्न होणार असून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांना संबोधित करणार आहेत. या प्रसंगी केंद्रीय सांस्कृतीक मंत्रीही उपस्थित राहणार आहे.
The Hon'ble Prime Minister Shri @narendramodi Ji will be inaugurating the 125th Birth Anniversary of Srila Prabhupada & release a special Commemorative Coin at 4.30 PM tomorrow.
— ISKCON (@iskcon) August 31, 2021
Join this historic event live on:
HINDI https://t.co/AQHTA874Ge
ENGLISH https://t.co/OJSNcJETrn pic.twitter.com/PeRj0xcn9f
श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद हे श्रीकृष्णाचे मोठे भक्त होते. त्यांचा जन्म 1896 साली कोलकाता येथे झाला. 1933 साली श्रील प्रभुपाद यांनी त्यांचे गुरु महाराज श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी यांच्याकडून दीक्षा घेतली. श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 1944 साली 'बॅक टू गॉड हेड' नावाने एक इंग्रजी पत्रिका सुरु केली. पाश्चिमात्य देशांत श्रीकृष्णाच्या भक्तीचा प्रसार करणे हा त्यामागचा उद्देश होता.
श्रील प्रभुपाद यांची भक्ती आणि कार्याची दखल घेत गौडीय वैष्णव समाजाने 1947 साली त्यांना 'भक्ती वेदांत' अशी उपाधी दिली. त्यांनी 1966 साली International Society For Krishna Consciousness (ISKCON) ची स्थापना केली. इस्कॉन ही एक मोठी भक्ती चळवळ असून 'हरे कृष्णा चळवळ' या नावाने ती ओळखली जाते. या माध्यमातून जगभरात वेदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो. इस्कॉनच्या माध्यमातून भगवतगीतेचा 89 भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- New Rules from 1st September : आजपासून आर्थिक व्यवहार आणि नियमांत मोठे बदल, जाणून घ्या काय
- Chalisgaon Flood : चाळीसगावात पुराचं पाणी ओसरलं, 500 हुन अधिक गुरं वाहून गेल्याची प्रशासनाची माहिती
- बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना दिलासा, त्यांच्या विरोधातील न्यायालयाच्या अवमानाची प्रक्रिया रद्द
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
