(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi's Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार, महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हिना गावित यांच्या नावाची चर्चा
महाराष्ट्रातून नारायण राणे, रणजीत नाईक निंबाळकरा आणि हिना गावित यांच्या नावाची चर्चा आहे.
नवी दिल्ली केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला होणार आहे. महाराषट्रातून नारायण राणे, हिना हावित यांच्या नावाची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातील 17 ते 22 मंत्री 7 जुलैला शपथ घेतील. शपथविधी 7 जुलैला होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे. एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एकामागून एक बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला आहे.
उत्तर प्रदेश
- तीन ते चार मंत्री सहभागी होण्याची शक्यता
- अपना दलच्या अनुप्रिया पटेल
बिहार
- दोन ते तीन मंत्री सहभागी होण्याची शक्यता
- भाजप- सुशील मोदी
- जेडीयूचे RCP सिंह
- एलजेपीचे पशुपती पारस
मध्यप्रदेश
- एक किंवा दोन मंत्री सहभागी होण्याची शक्यता
- ज्योतिरादित्य सिंधिया
- राकेश सिंह
राजस्थान
- एक मंत्री सहभागी होण्याची शक्यता
जम्मू-कश्मीर
- एक मंत्री सहभागी होण्याची शक्यता
लडाख
- एक मंत्री सहभागी होण्याची शक्यता
आसाम
- एक किंवा दोन मंत्री सहभागी होण्याची शक्यता
- सोनोवाल यांच्या नावाची चर्चा
पश्चिम बंगाल
- शंतनू ठाकूर
- निशीथ प्रामाणिक
ओडिसा
- एक मंत्री
केंद्रीय मंत्रिमंडळात 81 सदस्य असतील. सध्या 53 मंत्री आहे, म्हणजे 28 मंत्री सहभागी होणार आहे.
मोदी सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण केली आहे. सरकारी सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, पहिला विस्तार सर्वसमावेशक होण्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील बऱ्याच जणांना संघटनाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहर्यांचा समावेश असू शकतो. मंत्रिमंडळात प्रादेशिक पक्षांना समाविष्ट करण्याचीही तयारी आहे.