एक्स्प्लोर
स्वच्छ भारत अभियानात माध्यमांची भूमिका महत्त्वाची : मोदी
कार्यक्रम संपल्यानंतर मोदींसोबत सेल्फी काढण्यासाठी पत्रकारांनी गर्दी केली. अनेक दिग्गज पत्रकारांना मोदींसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
नवी दिल्ली : स्वच्छ भारत अभियानात माध्यमांनी खूप महत्वाची भूमिका बजावली, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. दिवाळीच्या निमित्ताने दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात 'दिवाळी मिलन' सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
'दिवाळी मिलन' कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अध्यक्ष अमित शाह, संरक्षणमंत्री निर्मला सितारामन, स्मृती इराणी यांचीही उपस्थिती होती. यावेळी मोदींनी छोटेखानी भाषण केलं.
याआधी पत्रकारांना शोधावं लागायचं. पत्रकारांची संख्या कमी होती. मात्र आता माध्यमांची चौकट वाढली आहे. त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान बनल्यानंतर दरवर्षी नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाला उपस्थिती लावतात आणि पत्रकारांशी संवाद साधतात. यंदाही त्यांनी दिवाळी मिलनची परंपरा कायम ठेवली.
कार्यक्रम संपल्यानंतर मोदींसोबत सेल्फी काढण्यासाठी पत्रकारांनी गर्दी केली. अनेक दिग्गज पत्रकारांनाही मोदींसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement