एक्स्प्लोर

PM Modi Speech: स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींचं 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्त्वाचं भाष्य, 1 लाख तरुणांना राजकारणात आणण्याची योजना

PM Modi Speech at Red Fort: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरुन भाषण. आगामी काळात देशात मोठे बदल होण्याचे संकेत. देशात समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता. एक देश, एक निवडणूक धोरणाबाबत महत्त्वाचं भाष्य

नवी दिल्ली: देशभरात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुका या देशाच्या प्रगतीत अडथळा बनत आहेत. त्यामुळे देशाच्या विकासात अडचणी येत आहेत. त्यामुळे आता संपूर्ण देशाने 'एक देश, एक निवडणूक' (One Nation One Election) हे धोरण अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केले. त्यांनी गुरुवारी देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी 'वन नेशन, वन इलेक्शन' धोरणाबाबत केलेले वक्तव्य आगामी काळाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. तब्बल 97 मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. मात्र, त्यांच्या भाषणातील सेक्युलर सिव्हिल कोड आणि वन नेशन, वन इलेक्शन हे दोन मुद्दे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले.

पंतप्रधान मोदी यांनी देशात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुकांबाबत भाष्य करताना म्हटले की, देशात कोणतीही योजना राबवायला गेले की त्याचा संबंध निवडणुकीशी जोडला जातो. निवडणूक आली म्हणून योजना आली, असे बोलले जाते. एकूणच सगळ्या गोष्टींचा संबंध निवडणुकीशी जोडला जातो. यादृष्टीने One Nation One  Election या धोरणाबाबत व्यापक चर्चा झाली आहे. राजकीय पक्षांनी याबाबत आपले विचार मांडले आहेत. एका समितीने याबाबत चांगला अहवाल मांडला आहे. आता संपूर्ण देशाने वन नेशन, वन इलेक्शनसाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे. भारतातील स्रोतांचा वापर जास्तीत जास्त सामान्य लोकांसाठी करता यावं, त्याचा अपव्यय कमी व्हावा यासाठी देशात वन नेशन, वन इलेक्शन धोरणाची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे. 

आता देशाने सेक्युलर सिव्हिल कोड स्वीकारला पाहिजे: पंतप्रधान मोदी

आपला देश 75 वर्षे कम्युनिल सिव्हिल कोडमध्ये राहिला आहे. यामध्ये आता बदल झाला पाहिजे. आता आपण सेक्युलर सिव्हिल कोडच्या दिशेने जायला पाहिजे. जेणेकरुन यापुढे देशात धर्माच्या आधारे होणाऱ्या भेदभावापासून मुक्ती मिळेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

1 लाख तरुणांना राजकारणात आणणार: मोदी

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला. देशातील घराणेशाही, जातीयवाद भारताच्या लोकशाहीचे नुकसान करत आहे. यापासून देशाला मुक्ती मिळाली पाहिजे. त्यासाठी एक मिशन हाती घेतले जाणार आहे. या मिशनअंतर्गत देशातील राजकारणात 1 लाख तरुणांना पुढे आणले जाईल. या तरुणांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसेल, त्यांचे वडील, काका किंवा मामा कोणीही राजकारणात नसेल. हे तरुण जिल्हा परिषद, पंचायत, विधानसभा किंवा लोकसभा कुठेही काम करतील. या तरुणांनी कोणत्या पक्षात यावे, याची सक्ती नाही. ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतात. मात्र, यामुळे देशाला घराणेशाही आणि जातीयवादापासून मुक्ती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

VIDEO: पंतप्रधान मोदी यांचं लाल किल्ल्यावरील भाषणात महत्त्वपूर्ण वक्तव्य

आणखी वाचा

पूर्वी देशात सरकार मायबाप होतं, नागरिकांना हात पसरावे लागायचे, आम्ही प्रशासनाचं मॉडेल बदललं: मोदी

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget