एक्स्प्लोर

PM Modi Biden Meeting : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांच्यात बैठक, दक्षिण आशियासह 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

PM Modi Biden Meeting : आज वॉशिंग्टनमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील 'टू प्लस टू' मंत्रिस्तरीय चर्चेच्या चौथ्या सत्रापूर्वी पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांच्यात ही ऑनलाइन बैठक होणार आहे.

PM Modi Biden Meeting : रशिया-युक्रेन युद्ध, श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि पाकिस्तानमधील राजकीय उलथापालथ यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांची आज भेट होणार आहे. दोन्ही नेत्यांमधील ही ऑनलाइन बैठक होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजेदरम्यान ही बैठक होण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते सध्याच्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतील. तसेच दक्षिण आशिया, इंडो-पॅसिफिक आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर घडामोडींवर चर्चा करतील. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी या ऑनलाइन बैठकीबाबत माहिती दिली.

सोमवारी वॉशिंग्टनमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील 'टू प्लस टू' मंत्रिस्तरीय चर्चेच्या चौथ्या सत्र होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही नेत्यांमधील ही ऑनलाइन बैठक होणार आहे. आज वॉशिंग्टनमध्ये चौथ्या सत्रात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन आणि परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा करतील.

मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन दक्षिण आशियातील सध्याच्या घडामोडी, इंडो-पॅसिफिक आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील, तसेच बैठकीदरम्यान विद्यमान द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतील.' 'ऑनलाइन बैठकीमुळे द्विपक्षीय व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने दोन्ही बाजूंना नियमित आणि उच्च-स्तरीय संपर्क सुरू ठेवता येईल,' असेही निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, वॉशिंग्टनमधून मिळालेल्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अर्थव्यवस्था आणि भारत-अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी सोमवारी पंतप्रधान मोदींसोबत ऑनलाइन बैठक घेणार आहेत."

महत्त्वाच्या इतर बातम्या 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget