एक्स्प्लोर
Ram Mandir | काही वेळातच पंतप्रधानांच्या हस्ते राममंदिराचं भूमीपूजन, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वाजून 40 मिनिटांनी राम जन्मभूमीवर राम मंदिराचा शिलान्यास करतील. असा असेल पंतप्रधान मोदी यांचा पूर्ण कार्यक्रम
अयोध्या: अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये दाखल झाले आहेत. काही वेळातच ते अयोध्येला पोहोचतील. अयोध्येच्या चौकाचौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वाजून 40 मिनिटांनी राम जन्मभूमीवर राम मंदिराचा शिलान्यास करतील.
असा असेल पंतप्रधान मोदी यांचा पूर्ण कार्यक्रम
- पंतप्रधान मोदी 9.35 वाजता दिल्लीहून लखनौसाठी निघाले. 10.35 वाजता लखनौला पोहोचले.
- सकाळी 10.40 वाजता लखनौ एअरपोर्टवरुन हेलिकॉप्टरने अयोध्येसाठी निघणार
- सकाळी 11.30 वाजता केएस साकेत पीजी कॉलेज पोहोचतील, त्यानंतर हनुमानगढी मंदिराकडे जाणार
- सकाळी 11.40 ते 11.50 वाजेपर्यंत हनुमानगढीमध्ये दर्शन आणि पूजा करणार
- दुपारी 12 वाजेपर्यंत श्रीराम जन्मभूमीवर पोहोचणार
- दुपारी 12 ते 12.10 वाजेपर्यंत भगवान रामललाचं दर्शन आणि पूजा
- दुपारी 12.15 से 12.25 दरम्यान पारिजातचं वृक्षारोपण करणार. इथून पंतप्रधान भूमीपूजन स्थळी जाणार
- शुभमुहुर्तावर पंतप्रधान मोदी भव्य राम मंदिराची पायाभरणी करणार
- दुपारी 12.30 ते 12.40 दरम्यान भूमीपूजन होणार
- त्यानंतर पंतप्रधान मोदी बुलेटप्रूफ मंडपात येणार, जिथं एक भव्य मंच बनवला आहे.
- या मंचावर मोदी 12.45 ते 2 वाजेपर्यंत राहतील. मोदी यांच्यासोबत मंचावर सरसंघचालक मोहन भागवत, श्री राम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास,
- उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित असतील. भागवत यांच्या भाषणानंतर मोदी यांचं भाषण होईल.
- दुपारी 2.15 वाजता साकेत पीजी कॉलेजला पंतप्रधान जातील, तिथून दुपारी साडेतीन वाजता ते लखनौ विमानतळावर पोहोचतील. तिथून दिल्लीकडे रवाना होतील.
हे ही वाचा-
Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही
राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली?
भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत
Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement