एक्स्प्लोर
Advertisement
पहिलं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, पंतप्रधान आवास योजनेत भरघोस सूट!
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या घरखरेदी सबसिडी योजनेचे तपशील आता जाहीर झाले आहेत. त्यानुसार पहिलं घर खरेदी करणाऱ्याला 20 वर्षे मुदतीच्या गृहकर्जावर तब्बल 2.4 लाखांचा फायदा होणार आहे.
गृहकर्जातील पहिल्या सहा लाखांवर 6.5 टक्क्यांची सबसिडी
या योजनेनुसार, जर तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाख रूपयांपर्यंत असेल तर तुम्ही पहिल्या घरखरेदीसाठी घेणार असलेल्या गृहकर्जातील सहा लाख रूपयांसाठी तुम्हाला 6.5 टक्क्यांची सबसिडी मिळेल. तुमच्या गृहकर्जाची रक्कम कितीही असली तरी तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला तुमच्या होमलोनमधील पहिल्या सहा लाखांवर 6.5 टक्क्यांची सवलत मिळेल. म्हणजे तुमच्या गृहकर्जाचा व्याज दर 9 टक्के असेल तर तुम्हाला पहिल्या सहा लाखांवर फक्त 2.5 टक्के व्याज व्याज भरावं लागेल. गृहकर्जाच्या उर्वरीत रकमेवर मात्र 9 टक्क्यांप्रमाणे व्याज देय असेल.
पहिला टप्पा: 6 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पहिल्या सहा लाखावर 2.5 टक्के व्याज
म्हणजेच जर समजा, तुमचं उत्पन्न 6 लाख रूपयांपर्यंत असेल आणि पहिल्या घराच्या खरेदीसाठी तुम्ही 20 वर्षांच्या मुदतीचं दहा लाख रूपये कर्ज घेतलं असेल तर पहिल्या सहा लाखांसाठी तुम्हाला फक्त 2.5 टक्के व्याज भरावं लागेल तर उर्वरीत चार लाखांसाठी तुम्हाला 9 टक्के दराने व्याज आकारणी होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली ही योजना तीन वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी आणि फक्त पहिलं घर खरेदी करणारांसाठी आहे. त्यानुसार सर्वच उत्पन्न गटातील घर खरेदीदारांना व्याजाच्या रकमेत दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दुसरा टप्पा: 12 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पहिल्या 9 लाखांपर्यंत 4 टक्के सूट
या योजनेतील दुसरा टप्पा आहे, रू. 12 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांचा. या गृहकर्जदारांना त्यांनी पहिल्या घरखरेदीसाठी घेतलेल्या 9 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर 4 टक्क्यांची सबसिडी मिळणार आहे.
सोप्या शब्दात सांगायचं तर समजा, तुमचं वार्षिक उत्पन्न 12 लाख रूपयांपर्यंत असेल आणि पहिल्या घराच्या खरेदीसाठी तुम्ही 20 वर्षांच्या मुदतीचं 25 लाख रूपये कर्ज घेतलं असेल तर पहिल्या नऊ लाखांसाठी तुम्हाला फक्त 5 टक्के दराने व्याज भरावं लागेल तर उर्वरीत 16 लाखांवर तुम्हाला 9 टक्के दराने व्याज आकारणी होईल.
तिसरा टप्पा: 18 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पहिल्या 12 लाखांपर्यंत 3 टक्के सूट
तसंच या योजनेतील तिसरा टप्पा हा वार्षिक 18 लाख रूपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांसाठी आहे. या उत्पन्न गटातील गृहकर्जदारांना त्यांच्या पहिल्या घराच्या खरेदीसाठी 12 लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 3 टक्के सबसिडी मिळणार आहे.
म्हणजेच तुमचं उत्पन्न 18 लाख रूपयांपर्यंत असेल आणि पहिल्या घराच्या खरेदीसाठी तुम्ही 20 वर्षांच्या मुदतीचं 50 लाख रूपये कर्ज घेतलं असेल तर पहिल्या बारा लाखांसाठी तुम्हाला फक्त 6 टक्के दराने व्याज भरावं लागेल तर उर्वरीत 38 लाखांवर तुम्हाला 9 टक्के दराने व्याज आकारणी होईल.
गृहकर्ज योजना 20 वर्षांपर्यंत
पंतप्रधान आवास योजनेनुसार जाहीर करण्यात आलेल्या या योजनेनुसार आधी फक्त 15 वर्षे मुदतीची गृहकर्जे ही अट रद्द करून ती 20 वर्षे करण्यात आली आहे. पहिल्यांदा घरखरेदी करणारे ग्राहक मासिक हफ्ता कमी राहावा म्हणून वीस वर्षांचा पर्याय स्वीकारतात.
ईएमआयमध्ये मोठी घट
सध्या गृहकर्जासाठी असलेला सर्वसाधारण 9 टक्क्यांचा व्याज दर गृहीत धरला तर सर्व उत्पन्न गटातील गृहकर्जदारांना किमान 2.4 लाख रूपयांचा सरसकट फायदा होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे होम लोनचा ईएमआय हा तब्बल 2200 रूपयांनी घटला जाईल.
* त्याशिवाय प्राप्तीकर कायद्याच्या कलम 24 नुसार गृहकर्जाच्या व्याजात मिळणारी सवलत ही सुरूच राहणार आहे. सध्या दोन लाख रूपयापर्यंतच्या गृहकर्ज व्याजावर प्राप्तिकर सवलत मिळते, हे इथे उल्लेखनीय आहे.
* पंतप्रधान आवास योजनेतील या सवलती अंमलात आणण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नॅशनल हाऊसिंग बँक आणि हुडको यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या योजनेचा एक भाग तसंच सध्या तुलनेने सुस्त असलेल्या रिअल इस्टेट सेक्टरला चालना मिळण्यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेली व्याज सवलत योजना मदतीची ठरणार आहे.
संबंधित बातम्या:
उत्पन्न गट | एवढ्या कर्ज रक्कमेपर्यंत सबसिडी | व्याज दरावरील सूट (टक्क्यांमध्ये) | ईएमआयमध्ये घट | व्याजावरील एकूण बचत |
रु. 6 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न | पहिल्या रु. 6 लाखांवर सूट | 6.5% सबसिडी | रु 2,219. मासिक बचत | रु. 246,625 |
रु. 12 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न | पहिल्या रु. 9 लाखांवर सूट | 4% सबसिडी | रु 2,158 मासिक बचत | रु. 239,843 |
रु. 18 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न | पहिल्या रु. 12 लाखांवर सूट | 3% सबसिडी | 2,200 मासिक बचत | रु. 2 44,468 |
*वीस वर्ष मुदतीच्या गृहकर्जावर 9% व्याजदरानुसार |
VIDEO: गृहकर्जावरील व्याजदरात 3 ते 4 टक्के कपात : पंतप्रधान
हक्काचं घर मिळवून देण्यासाठी योजनाअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
बातम्या
Advertisement