पीएम केअर फंडातून 3100 कोटींचं वाटप; स्थलांतरित मजूर, व्हेंटिलेटर्स अन् लस विकसित करण्याठी तरतूद
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पीएम केअर फंडातून 3100 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून दिली आहे. यात स्थलांतरित मजूर, व्हेंटिलेटर्स अन् लस विकसित करण्याठी तरतूद करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पीएम केअर फंडकडून 3100 कोटींचं वाटप करण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये स्थलांतरित मजुरांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील स्थलांतरित मजुरांसाठी एक हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर खरेदी आणि लसनिर्मितीसाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे. मंगळवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी 20 लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज घोषित केले आहे.
पीएम केअर फंडातील जवळपास दोन हजार कोटी हे व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. तर एक हजार कोटी हे प्रवास करणाऱ्या मजुरांसाठी देण्यात येणार आहे. यात महत्वाचे म्हणजे 200 कोटी रुपये हे कोरोना विषाणूवर लस विकसित करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. 27 मार्च 2020 ला पीएम केअर्स फंडाची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. यामध्ये संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री असे दोन अन्य सदस्य आहेत. यावेळी या फंडाला मदत करणाऱ्या सर्व दानशूरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. यातील संपूर्ण निधी हा कोरोना व्हायरसच्या संकटात वापरण्यात आला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मोठ्या घोषणा; कर्मचाऱ्यांना, उद्योग क्षेत्राला दिलासा
50 हजार व्हेंटिलेटर्स या फंडाच्या निधीतून तब्बल दोन हजार कोटी खर्च करुन 50 हजार स्वदेशी बनावटीचे व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याची योजना आहे. हे व्हेंटिलेटर्स कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या कोविड 19 रुग्णालयात या व्हेंटिलेटर्सचा वापर करण्यात येणार आहे. तर, एक हजार कोटी हे स्थलांतरित मजुरांसाठी वापरण्यात येणार आहेत. सध्या लाखो मजुर पायीच आपल्या घराकडे निघाले आहेत. यामध्ये त्याचं मोठं हाल होत आहे. खास या मजुरांसाठी या निधीचं वाटप करण्यात आलं आहे. कोरोना विषाणूवर लस शोधण्याचे प्रयत्न जगभरात सुरु आहेत. आपल्या देशातही यावर प्रयोग सुरू आहेत. यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी या फंडाची निर्मिती केली होती. यावेळी त्यांनी लोकांना पीएम केअर फंडासाठी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी ट्विट करत सांगितलं होतं की, “देशभरातील लोकांनी करोनविरोधीत लढाईत मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Income tax return date extended | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत : अर्थमंत्री | ABP Majha