एक्स्प्लोर

Petrol Diesel Prices : क्रूड ऑईल 9 डॉलर्सनी स्वस्त; पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्येही घट होणार?

Petrol-Diesel Price Today 6th July 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट, देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींची परिस्थिती काय?

Petrol-Diesel Price Today 6th July 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कच्च्या तेलाच्या किमती तब्बल 9 डॉलर्सनी घटल्याचं पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी मंदीच्या शक्यतेमुळे इंधनाचा वापर कमी होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती घटल्याचं पाहायला मिळतंय. 

भारतीय तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आज देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) स्थिर आहेत. देशातील पेट्रोल (Petrol) -डिझेलचे दर (Diesel Price) स्थिर आहेत. जवळपास दीड महिन्यापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहेत.  

यापूर्वी 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं होतं. त्यानंतर इंधनाचे दर स्थिर आहेत. ज्यावेळी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. केंद्रापाठोपाठ अनेक राज्यांनीही व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा होता. पण महाराष्ट्रात मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. तत्कालीन ठाकरे सरकारवर त्यावेळी विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. अशातच आता महाराष्ट्रात सत्तापालट झाला आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत बोलताना पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. या निर्णयाची घोषणा कधी होणार? आणि गगनाला भिडलेल्या किमतींमध्ये दिलासा कधी मिळणार, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे. 

देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचे दर काय?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इंधन दर स्थिर आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 102.63 रुपये तर, डिझेलचा दर 94.24, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रतिलिटर आहे. 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 

आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.88 रुपये तर डिझेलचा दर 95.37 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.74 रुपये तर डिझेलचा दर 96.20 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.08 रुपये तर डिझेलचा दर 95.59 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.34 रुपये तर डिझेलचा दर 95.84 रुपये प्रति लिटर आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, शेकडो जखमी, निरंजनी अखाड्याचे संत रडलेMaharashtra Temple Dress Code :देवाच्या दारी,नियमांची वारी; 3देवस्थानांचे मोठे निर्णय Special ReportSaurabh Bhondve : सौरभ भोंडवेचा संशयास्पद मृत्यू की घातपात? Special ReportBaba Siddique Case: सिद्दीकींची हत्या, SRA चा अँगल? झिशान यांच्या जबाबात कुणाची नावं?Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
Embed widget