Petrol Price Today : क्रूड ऑइलच्या दरात घट, पण पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; आजचे नवे दर काय?
Petrol-Diesel Price Today : आज देशात सलग 26व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर...
Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 29 November : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये गेल्या 26 दिवसांत कोणताही बदल झालेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. या दरांनुसार, आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. एकीकडे देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. क्रूड ऑईलची किंमत 73 डॉलरच्या खाली पोहोचली आहे.
IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर आणखी काही दिवस घसरण्याची शक्यता आहे. ही घसरण कायम राहिल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत किरकोळ किमती 15 दिवसांच्या 'रोलिंग' सरासरीच्या आधारे ठरवल्या जातात. अशा स्थितीत जागतिक स्तरावर दर सातत्याने घसरल्यानंतरच देशात इंधनाचे दर कमी होतील.
क्रूड तेलाची किंमत काय?
जागतिक बेंचमार्क ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमती नोव्हेंबरमध्ये (25 नोव्हेंबरपर्यंत) प्रति बॅरल सुमारे 80-82 डॉलर इतकी होती. मागील शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रति बॅरल 4 डॉलरने आणखी घट झाली. लंडनच्या ICE मध्ये त्याची किंमत सहा डॉलरने आणखी कमी झाली. कच्च्या तेलाच्या दरातील ही घट कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे निर्माण झालेल्या भीतीचा परिणाम असल्याचे म्हटले जाते.
भारतात इंधन कंपन्यांनी दर कमी का केले नाहीत?
देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करतात. परंतु, दरातील बदल हा गेल्या पंधरवड्यातील सरासरी बेंचमार्क आंतरराष्ट्रीय दरावर आधारित आहे. त्यामुळे रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या पंधरा दिवसांच्या सरासरीनुसार ठरले आहेत.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर
राज्यातील महत्त्वाची शहरं | पेट्रोल रुपये/लिटर | डिझेल रुपये/लिटर |
मुंबई | 109.98 रुपये | 94.14 रुपये |
पुणे | 109.45 रुपये | 92.25 रुपये |
रत्नागिरी | 111.69 रुपये | 94.43 रुपये |
औरंगाबाद | 110.75 रुपये | 93.50 रुपये |
नागपूर | 109.71 रुपये | 92.53 रुपये |
(टिप : वरील सर्व दर goodreturns.in या वेबसाईटवरुन घेण्यात आलेले आहेत.)
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा