Petrol-Diesel Price : अर्थसंकल्पात पेट्रोलियम पदार्थांवरील अनुदानात घट; पेट्रोल-डिझेल कडाडणार? जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Price Today 2 February 2022 : अर्थसंकल्पात पेट्रोलियम पदार्थांवरील अनुदानात घट करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
Petrol-Diesel Price Today 2 February 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजसाठी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. काल (मंगळवारी) म्हणजेच, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं अन्न, खतं आणि पेट्रोलियम उत्पादनांवरील अनुदानावर सरकारचा अर्थसंकल्प 39 टक्क्यांनी कमी होऊन 4,33,108 कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडण्याची शक्यता आहे. अशातच देशात गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तसेच, सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ होत नसल्याची चर्चा सुरू आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये 14 राज्यांमधील 30 विधानसभा आणि 3 लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता. त्यानंतर तीन नोव्हेंबर रोजी रात्री केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर काही राज्यांनी आपला कर कमी करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 80 दिवस इंधन दर स्थिर आहेत. त्यामुळे निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर इंधन कंपन्या दरवाढ करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवण्यात सरकारची भूमिका नाही, असे अनेकदा सरकारकडून म्हटले जाते. मात्र निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
राज्यातही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. आज देशात सलग 76 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...
राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती :
प्रमुख शहरं | पेट्रोलची किंमत प्रति लिटर | डिझेलची किंमत प्रति लिटर |
मुंबई | 109.98 रुपये प्रति लिटर | 94.14 रुपये प्रति लिटर |
ठाणे | 110.12 रुपये प्रति लिटर | 94.28 रुपये प्रति लिटर |
पुणे | 109.72 रुपये प्रति लिटर | 92.50 रुपये प्रति लिटर |
नाशिक | 109.79 रुपये प्रति लिटर | 92.57 रुपये प्रति लिटर |
नागपूर | 110.10 रुपये प्रति लिटर | 92.90 रुपये प्रति लिटर |
कोल्हापूर | 109.66 रुपये प्रति लिटर | 92.48 रुपये प्रति लिटर |
अहमदनगर | 110.12 रुपये प्रति लिटर | 92.90 रुपये प्रति लिटर |
अमरावती | 111.14 रुपये प्रति लिटर | 93.90 रुपये प्रति लिटर |