Petrol-Diesel Price Today : आजचे इंधन दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत
Petrol-Diesel Price Today : इंधन कंपन्यांनी शनिवारीही ग्राहकांना दिलासा दिला आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. प्रमुख राज्यांमधील तेलाचे आजचे दर जाणून घ्या.
Petrol-Diesel Price Today : इंधन कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले आहेत. इंधन कंपन्यांनी शनिवारीही ग्राहकांना दिलासा दिला आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या महिन्याभरात तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.
IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर कायम आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत 109.70 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.52 रुपये प्रति लिटर आहे.
देशातील प्रमुख शहरांतील दर :
देशातील प्रमुख शहरं | पेट्रोलची किंमत प्रति लिटर | डिझेलची किंमत प्रति लिटर |
मुंबई | 109.98 | 94.14 |
दिल्ली | 95.41 | 86.67 |
चेन्नई | 101.40 | 91.43 |
कोलकाता | 104.67 | 89.79 |
पाटणा | 105.92 | 91.09 |
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Variant : सावधान! ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये 'हे' प्रमुख लक्षण
- Amazon : अमेझॉनला मोठा झटका! CCIकडून मोठी डील रद्द; 202 कोटींचा दंड ठोठावला
- Merry Christmas 2021 : 'हॅपी ख्रिसमस' ऐवजी का बोलतात 'मेरी ख्रिसमस'? 'हे' आहे कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha