Petrol-Diesel 16 July : 4 मेपासून पेट्रोलच्या किमतीत 40 वेळा वाढ; जाणून घ्या, आजचे दर काय?
4 मेपासून पेट्रोलच्या दरांत 40 वेळा वाढ झाली आहे. तर डिझेलचे दर 37 वेळा वाढले असून एकदा कमी करण्यात आले आहेत. तेव्हापासून पेट्रोल 11.14 रुपये आणि डिझेल 9.14 रुपये प्रति लिटरनं वाढलं आहे.
![Petrol-Diesel 16 July : 4 मेपासून पेट्रोलच्या किमतीत 40 वेळा वाढ; जाणून घ्या, आजचे दर काय? Petrol-Diesel Price Hike petrol diesel prices today on 16 july unchanged delhi mumbai kolkata chennai check rates in your city Petrol-Diesel 16 July : 4 मेपासून पेट्रोलच्या किमतीत 40 वेळा वाढ; जाणून घ्या, आजचे दर काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/27/c43a94a0e8c7d29d595c601dd557c0a3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Petrol-Diesel Price 16 July : आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून तेल कंपन्यांनी किमतींमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट झाली आहे. देशभरात तेलाच्या किमतींनी सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. पेट्रोलनं केव्हाच शंभरी ओलांडली आहे, तर डिझेलचे दर शंभरी गाठण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी गुरुवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 15 पैसे प्रति लिटरनं वाढ करण्यात आली होती. दिल्लीमध्ये आज पेट्रोल 101.54 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत 29 मे रोजी पेट्रोलच्या दरानं पहिल्यांदाच शंभरी ओलांडली होती. तसेच गुरुवारी पेट्रोलच्या दरात वाढ होत, 107.54 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलची किंमत 97.45 रुपये इतकी आहे. 4 मेनंतर पेट्रोलच्या दरात 40 वेळा वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 37 वेळा वाढ करण्यात आली. या दरम्यान दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमती 11.14 रुपये आणि डिझेलच्या किमती 9.14 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे.
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :
शहरं | पेट्रोची किंमत प्रति लिटर | डिझेलची किंमत प्रति लिटर |
दिल्ली | 101.54 | 89.87 |
मुंबई | 107.54 | 97.45 |
बंगळुरू | 104.94 | 95.26 |
चंदीगढ | 97.64 | 89.50 |
लखनौ | 98.63 | 90.26 |
पाटना | 103.91 | 95.51 |
जयपूर | 108.40 | 99.02 |
हैदराबाद | 105.52 | 97.96 |
गुरुग्राम | 99.17 | 99.02 |
गंगानगर | 112.90 | 103.15 |
यापूर्वी गुरुवारी इंधनदरात वाढ झाली होती, काय होते दर?
मंगळवारी आणि बुधवार, अशा दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर तेल कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली होती. मागील दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. अशातच काल चार प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल 31-39 पैसे आणि डिझेल 15-21 पैसे प्रति लिटरपर्यंत महागलं आहे. या दरवाढीनंतर आता देशभरातील इंधनांचे दर नव्या उंचीवर पोहोचले आहेत. आता राजधानी दिल्लीत पेट्रोलचे नवे दर 101.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.
मुंबईत पेट्रोल 107.54 रुपये आणि डिझेल 97.45 रुपये प्रति लिटर दरानं विकण्यात येत आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 101.35 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.23 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
दरम्यान, देशातील सर्व महानगरातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत.
देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)