एक्स्प्लोर
पेट्रोल-डिझेल घरपोच, लवकरच ऑनलाईन विक्रीही होणार
पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाची ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन ऑर्डर केलेलं पेट्रोल-डिझेल घरपोच मिळेल.
नवी दिल्ली : लवकरच तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल घरपोच मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सोबतच सर्व पेट्रोलियम उत्पादनं लवकरच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत.
पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाची ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन ऑर्डर केलेलं पेट्रोल-डिझेल घरपोच मिळेल.
दिल्लीतील इंडिया मोबाईल कॉंग्रेसच्या कार्यक्रमात प्रधान बोलत होते. दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीसाठी सरकार लवकरच ऑनलाइन गृहनिर्माण यंत्रणेचे वितरण सुरु करणार असल्याचंही ते म्हणाले.
पेट्रोल-डिझेलच्या वधारलेल्या भावामुळे सर्वसामान्य वाहनचालक संतापले आहेत. दिवाळीपर्यंत इंधनाचे भाव घसरण्याची ग्वाही प्रधान यांनी गेल्या आठवड्यात दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement