एक्स्प्लोर
'डबे घसरले नि डोळ्यादेखत त्या चिमुरडीच्या शरीराचे दोन तुकडे'
कानपूर : पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरुन झालेल्या दुर्घटनेत अनेक प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात एका चिमुरडीचे माझ्या डोळ्यादेखत दोन तुकडे झाले, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. 'नवभारत टाइम्स'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
दोन वर्षांची एक चिमुरडी उज्जैनहून तिच्या कुटुंबीयांसोबत ट्रेनने प्रवास करत होती. अख्ख्या प्रवासात ती मजा-मस्ती करत येत होती. मात्र पहाटेच्या सुमारास तो भीषण अपघात झाला नि आमच्या डोळ्यांदेखत तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले, असा दावा संबंधित प्रवाशाने केला आहे.
LIVE : पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, 63 प्रवाशांचा मृत्यू
रविवारी पहाटे तीन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास कानपूरमधल्या पुखरायन भागात एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले. अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. माल डब्ब्यासह GS,GS,A1,B1/2/3,BE,S1/2/3/4/5/6 हे डबे घसरले. अपघाताची माहिती मिळताच मेडिकल टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातानंतर त्या मार्गावरील इतर ट्रेनचा मार्ग वळवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव जातीने या दुर्घटनेची माहिती घेत असून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मदतीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना साडेतीन लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमी व्यक्तींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement