1988 Road Rage Case : नवज्योत सिंह सिद्धू यांनी कोर्टासमोर शरणागती पत्करली
1988 Road Rage Case : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी आज पटियाला न्यायालयात (Patiala court) शरणागती पत्करली आहे.
1988 Road Rage Case : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू (Navjot singh sidhu) यांनी आज पटियाला न्यायालयात (Patiala court) शरणागती पत्करली आहे. 34 वर्ष जुन्या प्रकरणात गुरुवारी नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sindhu) यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी सिद्धू यांनी आज कोर्टात शरणागती पत्करली.
शुक्रवारी सकाळी नवज्योत सिंह सिद्धू यांनी कोर्टाकडे वेळ मागितल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सिद्धू यांना कोर्टापुढे आत्मसमर्पण करण्यासाठी चार ते सहा आठवड्यांचा वेळ हवा आहे. त्यासाठी ते अर्ज करणार आहेत. आशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, सिद्धूंनी शुक्रवारी दुपारी दिल्लीच्या पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले.
Patiala, Punjab | He (Navjot Singh Sidhu) has surrendered himself before Chief Judicial Magistrate. He is under judicial custody. Medical examination and other legal procedures will be adopted: Surinder Dalla, media advisor to Congress leader Navjot Singh Sidhu pic.twitter.com/U13TDDOPju
— ANI (@ANI) May 20, 2022
न्यायालयीन कोठडीत घेतले
नवज्योत सिंह सिद्धू यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर शुक्रवारी आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले आहे. शरणागती पत्करल्यानंतर आता त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. त्याशिवाय इतर कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले जाणार आहे, असे सिद्धू यांचे माध्यम सल्लागार सुरिंदर डल्ला यांनी सांगितले.
प्रकरण नेमकं काय?
27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंह संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 1.5 किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु होऊन फक्त एक वर्ष झाले होते. त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंह यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंहला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते.
महत्वाच्या बातम्या: