एक्स्प्लोर
धर्म वाचवण्यासाठी गौरी लंकेश यांची हत्या, परशुराम वाघमारेची कबुली
गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी परशुरामला नेमक्या कुठल्या संघटनेनं किंवा संस्थेनं ही कामगिरी सोपवली? त्यामागे कुणाचा हात आहे? याबाबत कुठलीही माहिती अद्याप एसआयटीने दिली नाही.
बंगळुरु : केवळ धर्म वाचवण्यासाठी आपण पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली परशुराम वाघमारे याने दिली, असा दावा कर्नाटक एसआयटीने केला आहे. विशेष म्हणजे, गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी आपण बेळगावात ट्रेनिंग घेतल्याची कबुलीही परशुरामने दिली. त्यासाठी एअरगनचा वापर करण्यात आला.
गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी परशुरामला नेमक्या कुठल्या संघटनेनं किंवा संस्थेनं ही कामगिरी सोपवली? त्यामागे कुणाचा हात आहे? याबाबत कुठलीही माहिती अद्याप एसआयटीने दिली नाही.
दुसरीकडे, बंगळुरुत 5 सप्टेंबरला 2017 ला गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी त्याला तीन जणांनी मदत केली. या तीन जणांचा एसआयटी शोध घेते आहे. मात्र त्यांची नावं अद्याप उघड केलेली नाहीत. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी परशुरामला महाराष्ट्रातून अटक कऱण्यात आली आहे.
कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचं गूढ उकलणार?
दरम्यान, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचं गूढ उकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आल्याचं फॉरेन्सिक चाचणीतून समोर आलं असल्याचं एसआयटीने म्हटलं आहे. मात्र तिघांच्या हत्येसाठी जी बंदुक वापरण्यात आलं ते अद्याप मिळालं नसल्याचं एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बंदुक सापडली नसली तरी शरिरात घुसलेल्या गोळीवरुन कुठली बंदुक वापरण्यात आली या निष्कर्षापर्यंत पोहोचता येत असल्याचं एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement