Parshuram Khune : पद्म पुरस्कार झाडीपट्टीच्या रसिकांना अर्पण, पद्मश्री जाहीर झाल्यानंतर परशुराम खुणे यांची 'एबीपी माझा'ला पहिली प्रतिक्रिया
Parshuram Khune : झाडीपट्टी रंगभूमी कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
![Parshuram Khune : पद्म पुरस्कार झाडीपट्टीच्या रसिकांना अर्पण, पद्मश्री जाहीर झाल्यानंतर परशुराम खुणे यांची 'एबीपी माझा'ला पहिली प्रतिक्रिया Parshuram Khune I would like to dedicate this award to the fans of Zadhipatti Parshuram Khune first reaction to ABP Majha after the announcement of the Padma Shri award Parshuram Khune : पद्म पुरस्कार झाडीपट्टीच्या रसिकांना अर्पण, पद्मश्री जाहीर झाल्यानंतर परशुराम खुणे यांची 'एबीपी माझा'ला पहिली प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/a8ee79df7c314416db34b503c677eee01674662475069254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Parshuram Khune : झाडीपट्टी रंगभूमीचे (Zadipatti) कलाकार परशुराम खुणे (Parshuram Khune) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 'विदर्भाचा दादा कोंडके' म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांनी अनेक वर्षे झाडीपट्टी रंगभूमीची सेवा केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,"पद्मश्री पुरस्कार मला झाडीपट्टीच्या रसिकांना अर्पण करायचा आहे".
पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया देत परशुराम खुणे म्हणाले,"गेल्या 50 वर्षांपासून मी झाडीपट्टी रंगभूमीवर कार्यरत आहे त्याचं फलित मला आज मिळालं. हा पुरस्कार मला झाडीपट्टीच्या रसिकांना अर्पण करायचा आहे".
परशुराम खुणे पुढे म्हणाले,"गेल्या काही दिवसांत झाडीपट्टी रंगभूमीचा विस्तार झाला आहे. त्यामुळे झाडीपट्टी रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या रसिकांचा मी आभारी आहे. झाडीपट्टी रंगभूमीची सेवा करण्यासाठी माझ्या कुटुंबियांनी आजवर खूप साथ दिली आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम मला बालाजी पाटील बोरकर यांची आठवण आली".
#PadmaAwards2023 | Parshuram Komaji Khune, Zadipatti Rangbhumi artist from Gadchiroli, having played 800 different roles in more than 5,000 drama shows to receive Padma Shri in the field of Art (Theatre) pic.twitter.com/jG2jVIriVo
— ANI (@ANI) January 25, 2023
परशुराम खुणे यांनी आतापर्यंत 800 पेक्षा अधिक नाटकांचे पाच हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले आहेत. मराठी रंगभूमी त्यांनी गाजवली आहे. 'संगीत एकच प्याला' नाटकातील तळीराम, 'सिंहाचा छावा' मधील शंखनाद, 'संगीत लग्नाची बेडी'तील अवधूत, 'लावणी भुलली अभंगाला'मधील गणपा अशा त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.
For 2023, the President has approved conferment of 106 Padma Awards incl 3 duo cases. The list comprises 6 Padma Vibhushan, 9 Padma Bhushan & 91 Padma Shri. 19 awardees are women & the list also includes 2 persons from category of Foreigners/NRI/PIO/OCI and 7 Posthumous awardees pic.twitter.com/Gl4t6NGSzs
— ANI (@ANI) January 25, 2023
डॉ. खुणे हे उत्तम जादूगार असून त्यांनी आपल्या या कलेचा उपयोग अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी केला आहे. 20 वर्षे गुरनोली ग्रामपंचायतचे सरपंच राहिलेले खुणे शेतीत अनेक उपक्रम राबवून शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कारही पटकावला आहे. दहा वर्षे झाडीपट्टी कला निकेतन मंचाचे अध्यक्ष राहिलेल्या खुणे यांना झाडीपट्टी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचाही मान मिळाला आहे.
संबंधित बातम्या
Padma Award 2023: ORS चे दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण, झाडीपट्टी रंगभूमी कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री; 26 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)