एक्स्प्लोर

Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

Monsoon Session 2026 : संसदेच्या मान्सून सत्रात 131 वे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक (Delimitation Bill) मंजूर करण्यासाठी पुन्हा प्रयत्न होणार आहेत. यावेळी संख्याबळाचं संपूर्ण गणित बदलल्याचं चित्र आहे. 

Parliament Monsoon Session 2026 : येत्या 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या मान्सून सत्रात मोदी सरकार पुन्हा एकदा 'संविधान (131 वे संशोधन) विधेयक 2026' म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सज्ज झाले आहे. यापूर्वी एप्रिल 2026 मधील बजेट सत्रात हे विधेयक अवघ्या 54 मतांमुळे फेटाळले गेले होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांत संसदेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. विरोधी आघाडीत पडलेली फूट आणि प्रमुख पक्षांमधील बंडखोरीमुळे एनडीएचे (NDA) बळ वाढले असून यंदा हे विधेयक मंजूर होणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी केली आहे. विधेयकाचा अंतिम मसुदा पाहिल्याशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे खरगे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Delimitation Bill 2026 : काय आहे 131 वे सुधारित विधेयक?

या विधेयकात प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या तरतुदी आहेत:

1. लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या 543 वरून वाढवून 850 पर्यंत करणे.
2. महिलांसाठीचे 33 टक्के आरक्षण (नारी शक्ती वंदन अधिनियम) परिसीमन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लागू करणे.

या विधेयकानुसार, प्रत्येक राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेच्या जागा निश्चित केल्या जातील. मात्र, दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा याला तीव्र विरोध आहे. लोकसंख्या नियंत्रणात यश मिळवणाऱ्या या राज्यांच्या जागा कमी होऊन त्यांची राजकीय ताकद घटेल, अशी भीती त्यांना सतावत आहे.

April 2026 Parliament Vote : एप्रिलमध्ये कसे पडले होते विधेयक?

17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत या विधेयकावर मतदान झाले होते. त्यावेळी एकूण 528 खासदारांनी मतदान केले. संविधान संशोधनासाठी दोन-तृतियांश बहुमताची म्हणजेच 352 मतांची गरज होती. परंतु, सरकारच्या बाजूने केवळ 298 मते पडली, तर विरोधात 230 मते पडली. परिणामी, अवघ्या 54 मतांमुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (TMC), डीएमके (DMK), शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), सपा आणि आरजेडी या पक्षांनी एकत्र येत हे बिल पाडले होते.

Parliament Seat Equations Change : तीन महिन्यांत बदललेले संसदेचे गणित

गेल्या तीन महिन्यांत 1985 च्या पक्षांतरबंदी कायद्यानंतरचे सर्वात मोठे पक्षांतर पाहायला मिळाले आहे. चार विरोधी पक्षांमधील तब्बल 37 खासदार फुटून सत्ताधारी एनडीएच्या गोटात सामील झाले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या 20 खासदारांनी बंडखोरी करत 'नॅशनल कॉमन पीपुल्स इनिशिएटिव्ह' (NCPI) हा नवीन गट स्थापन केला असून एनडीएला पाठिंबा दिला आहे. 

त्याचवेळी उद्धव ठाकरे गटातील 6 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. त्या आधी आम आदमी पक्षाच्या 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या सर्व घडामोडींनंतर एनडीएचे संख्याबळ 292 वरून थेट 329 वर पोहोचले आहे. सध्या लोकसभेत तीन जागा रिक्त असल्याने दोन-तृतियांश बहुमताचा आकडा 360 वर आला आहे. म्हणजेच एनडीए आता बहुमताच्या जादूई आकड्यापासून अवघ्या 31 मतांच्या अंतरावर आहे.

Mission 360 NDA Strategy : एनडीएचे 'मिशन 360' 

एनडीएने दोन-तृतियांश बहुमत गाठण्यासाठी 'मिशन 360' अंतर्गत प्रादेशिक पक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

तामिळनाडूमधील डीएमकेने 'INDIA' आघाडीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. जर केंद्र सरकारने सर्व राज्यांमध्ये 50 टक्के जागा वाढवण्याची हमी दिली, तर डीएमके पाठिंबा देऊ शकते, अशी माहिती आहे.

त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रत्येक राज्यात 50 टक्के जागा वाढवण्याची लेखी हमी मिळाल्यास विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत विचार करू, असे म्हटले आहे. संजय राऊत यांनीही विरोधी पक्षांनी सूचवलेल्या दुरुस्त्या स्वीकारल्यास पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली आहे.

डीएमके (22 खासदार) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (8 खासदार) यांनी पाठिंबा दिल्यास एनडीएचा आकडा 359 वर पोहोचेल आणि इतर मित्रपक्षांच्या मदतीने 360 चा टप्पा सहज पार करता येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
Mohan Bhagwat On LGBTQ Marriage : समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget