एक्स्प्लोर
Advertisement
‘पनामा पेपर्स’मध्ये पुन्हा एकदा भारतातील बडी नावे उघड
‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरातील शोधपत्रकारांनी यासंदर्भातील 12 लाख नव्या कागदपत्रांचा अभ्यास केला आहे, ज्यातील 12 हजार पाने करचुकव्या भारतीय व्यवसायिकांशी संबंधित आहेत. तसेच नव्या कागदपत्रांमुळे या प्रकरणात अगोदर उघड झालेल्या व्यक्तींच्या करचुकवेगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
मुंबई : जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘पनामा’ प्रकरणात पुन्हा एकदा नवी कागदपत्रे समोर आली आहेत. या कागदपत्रांमध्ये बनावट कंपन्यांद्वारे पैशाचा फेरफार करणाऱ्या अनेक मोठ्या भारतीय उद्योगपतींचीही नावे उघड झाली आहेत.
‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरातील शोधपत्रकारांनी यासंदर्भातील 12 लाख नव्या कागदपत्रांचा अभ्यास केला आहे, ज्यातील 12 हजार पाने करचुकव्या भारतीय व्यवसायिकांशी संबंधित आहेत. तसेच नव्या कागदपत्रांमुळे या प्रकरणात अगोदर उघड झालेल्या व्यक्तींच्या करचुकवेगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
नव्या कागदपत्रांत कोणाकोणाचे नाव ?
उघड झालेल्या नव्या कागदपत्रांत भारतातील दिग्गज उद्योगपतींची नावे समोर आली आहेत. यामध्ये पीव्हीआरचे मालक अजय बिजली आणि त्यांचे कुटुंबीय, हाईक मेसेंजरचा सीईओ आणि सुनील मित्तल यांचा मुलगा कवीन मित्तल, एशियन पेंट्सचे सीईओ अश्विन दानींचा मुलगा जलज दानी यांचा समावेश आहे.
नेमकं काय आहे ‘पेनामा पेपर्स’ प्रकरण ?
कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेजवळील पनामा या देशात पैशाचा फेरफार करण्यासाठी जगभरातील अनेक उद्योगपतींसह सेलेब्रिटींनी बनावट कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांचा वापर बेहिशेबी पैसा लपवणे, कर चुकवणे अशा कारणांसाठी केला गेला.
जगभरातील शोधपत्रकारांनी एकत्र येत पनामातील मोझॅक फॉन्सेका या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची लाखो कागदपत्रे उजेडात आणली. 2016 साली उघड झालेल्या कागदपत्रांत जगातील अनेक मोठ्या व्यक्तींची नावे समोर आली. ज्यामध्ये 500 भारतीयांचाही समावेश होता.
याबाबतची चौकशी करण्यासाठी भारत सरकाकडून मल्टी एजन्सी गृपची (MSG) स्थापना करण्यात आली. ज्याद्वारे उघड झालेल्या गैरव्यवहारातील 426 व्यक्तींची चौकशी चालू आहे.
दरम्यान,’पनामा पेपर्स’ प्रकरणात नाव आल्यामुळेच पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शऱीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement