एक्स्प्लोर
Advertisement
पाकच्या 'नापाक' हरकती सुरूच, जम्मू काश्मिरमध्ये मुख्यालयावर ग्रेनेडचा हल्ला!
पाकिस्तानी सेनेकडून जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. संघर्ष विरामाचे उल्लंघन करत पाक सेनेकडून रॉकेट संचलित ग्रेनेडद्वारे हल्ला केला तसेच गोळीबार देखील केल्याची माहिती भारतीय सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
नवी दिल्ली: वारंवार इशारा देऊन देखील पाकिस्तान आपल्या 'नापाक' हरकती सोडायचं नाव घेत नाही. रविवारी सुंदरबनीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर मंगळवारी पुन्हा पाकिस्तानी सेनेकडून जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाक सेनेकडून रॉकेट संचलित ग्रेनेडद्वारे हल्ला केला तसेच गोळीबार देखील केल्याची माहिती भारतीय सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
या ठिकाणी भारतीय सेनेचे मुख्यालय असून तिथे शिबीर सुरु असल्याची माहिती आहे. 'पाकिस्तानी सेनेने संघर्ष विरामाचे उल्लंघन करत ग्रेनेड हल्ला केला आणि सोबतच गोळीबार देखील केला. यामुळे पूंछ स्टोर शेल्टर मध्ये आग लागली', असं जम्मूमधील सेना प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले. पूंछचे पोलीस अधीक्षक राजीव पांडे यांनी सांगितले की, सीमेच्या दुसऱ्या बाजूने फेकलेला बाँब सेना ब्रिगेड मुख्यालयात पडल्याने तिथे आग लागली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, कालच दोन्ही देशांमध्ये डीजीएमओ स्तरावर चर्चा झाली. ज्यामध्ये सीमेवरील घुसखोरी आणि हल्ल्याचा विरोध करत एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर कुठल्याही कारणाशिवाय होणाऱ्या गोळीबारामुळे आम्ही चिंतीत आहोत. यापुढे गोळीबार सहन केला जाणार नाही, असे विदेश मंत्रालयाकडून पाकिस्तानी उच्चायोगाला सांगण्यात देखील आलं आहे. जम्मू काश्मीरच्या सुंदरबनीमध्ये 21 ऑक्टोबर रोजी नियंत्रण रेषेवर (एलओसी) झालेल्या चकमकीत भारतीय सेनेचे तीन जवान शहीद झाले होते. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. सीमेवर सध्या भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. 30 मेपासून दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे प्रयत्न सात वेळा हाणून पाडले असून भारतीय सेनेपासून 23 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement